०१) कमी बोला, स्वभाव शांत ठेवा ०२) लोकांचं म्हणणं ऐकून घ्या ०३) फटकळ स्वभाव सोडा, डिप्लोमॅटिक रहा ०४) वाद, मतभेद होतील असं काही बोलू नका ०५) शिव्या देऊ नका ०६) फुकटचे सल्ले देऊ नका ०७) फुकटच्या चौकशा करू नका ०८) दुसऱ्यांवर हसू नका ०९) दुसऱ्यांना कमी लेखू नका १०) टोमणे मारून, "मी किती भारी' असं दाखवू नका ११) बडेजावपणा किंवा बढाया मारू नका १२) चांगले कपडे घाला १३) गबाळेपणा टाळा १४) डोळे स्वच्छ, तजेलदार ठेवा १५) अंगाला, तोंडाला वास येणार नाही याची काळजी घ्या १६) जात, धर्म यावरून कोणाला नावं ठेवू नका १७) मोठ्याने बोलणं किंवा हसणं टाळा. १८) कोणाचं काही अडलं असेल तर त्यांना मदत करा १९) स्वतःच्या दुःखांचं जाहीर प्रदर्शन मांडू नका २०) वागण्यात संयमीपणा ठेवा, आततायीपणा नको लोकं आपल्यापेक्षा हुशार आहेत, हे लक्षात ठेवा. त्यांचा आदर करा, तुम्हाला सुद्धा ते आदराने वागवतील. -------------------------------------------------------------------- तर Dear Smartphone Users, या पुस्तकाचे शीर्षक '५१ ऑनलाईन बिझनेस आयडिया' तुमच्या मनाचे दार ठोठावत असेलच. तर याबद्दल सविस्तर समजून घेऊयात. Demo e...
जगातील पहिला मोबाईल फोन मोटोरोला कंपनीच्या मार्टिन कूपर ह्या व्यक्तीने १९७३ साली विकसित केला व वापरून दाखवला. १९९० साली जगभरात १.२४ कोटी मोबाईल फोन वापरकर्ते होते. २००९ सालाअखेरीस हा आकडा ४.६ अब्ज इतका आहे. सध्या विकसित देशांमधील १०० व्यक्तींपैकी ९७ तर जगातील १०० व्यक्तींपैकी ४५ व्यक्ती मोबाईल फोन (Smartphone) वापरत आहेत. म्हणून आज स्मार्टफोन म्हणजे आपल्या हातातील जादूची कांडीच होय. मग मला बिझनेस सुरू करायचायं, पण त्यासाठी माझ्याकडे पैसेच नाहीय किंवा पैसे कमी आहे किंवा मला एखादी चांगली आयडियाच सुचत नाहीय असे जर तुम्ही वारंवार म्हणत असाल तर हे तुमचे म्हणणे थोडे आज मुर्खपणाचेच ठरेल, होय. तसेच मी नवीन आहे, मला बिझनेस बद्दल अजून जास्त काही माहीत नाही, माझ्याकडे व्यवसायाचे ज्ञान नाही किंवा कोणते एखादे स्किलपण नाही, अनुभवही नाही मग मी व्यवसाय कसा करू शकतो? आणि त्यातल्या त्यात ऑनलाईन बिझनेस तर कसाच शक्य नाही...असे तुम्हाला जर वाटत असेल तर लवकरच तुम्ही Outdated होण्याच्या मार्गावर आहेत, असे समजा. होय मित्रांनो, अजूनही तुम्ही याच Outdated विचारांच्या समुद्रात बुडालेले असाल तर तुम्हाल...