Skip to main content

तुम्ही कोणतीही गोष्ट विकू शकता जर..



उद्योजक मित्रांनो

तुम्हाला श्रीमंत करणारी जगाच्या पाठीवर एकच व्यक्ती आहे आणि ती म्हणजे तुम्ही स्वतः 

तेव्हा श्रीमंत होण्याचा निर्धार करा व वाटचाल सुरू करा मी तुम्हाला प्रचंड यशासाठी सुयश चिंतीतो आणि सुभेच्छा देतो

भारत पाटील, e4 मराठी उद्योजक, महाराष्ट्र!

तर चला मग, तुम्ही तुमची बिझनेसची नोटबुक आणि पेन घेऊन तयार असालच, नाही का. 

"मित्रांनो, तुम्ही कोणतीही गोष्ट विकू शकता"

परंतु त्याच्या 50 टिप्स समजल्याशिवाय नाही. म्हणून आता एक-एक गोष्ट सविस्तरपणे समजून घेऊयात!

विकणे ही एक कला आहे

ज्याच्याजवळ ही कला असेल तो कधीच भीक मागू शकत नाही, तो कधीच उपाशी राहू शकत नाही. 

कारण आज जगातल्या सर्व श्रीमंत लोकांकडे पाहिलं तर ते एकाच गोष्टीमुळे श्रीमंत आणि यशस्वी बनू शकले.

ते म्हणजे त्यांना 'चांगले विकता' येत होते. म्हणून नेहमी लक्षात ठेवा.

Marketing is the Heart And Selling is the Soul of Your Business!

व्यवसाय कुठलाही असो तो एकदम किंवा योगायोगाने सुरूही होत नाही आणि वाढतही नाही. तो फक्त होऊ शकतो ते योग्य नियोजनानेच. होय, तुम्ही पाहीलं असेल की एक व्यक्ती रस्त्यावर चपला-बुटं विकतो व दुसरा तेच चपला-बुटं मोठ-मोठ्या मॉलमध्ये, काचेच्या शोरूममध्ये विकतो. दोघांमध्ये फरक काय? तर तो म्हणजे त्यांची 

'विकण्याची पद्धत' 

होय. ती म्हणही खोटी नाहीय की, बोलणाऱ्याचे दगडही विकले जातात व न बोलणाऱ्याचे गहू सुद्धा विकले जात नाही. कारण बोलणाऱ्याला 'विकण्याची कला, पद्धत' माहीत असते व न बोलणारा अजूनही त्याचे गहूच धरून बसलेला असतो. म्हणून मित्रांनो तुमचे ध्येय मोठे ठेवा. व्यवसाय करा. अगदी छोट्या पासून सुरुवात करा. एक-एक गोष्ट  विकायला शिका. त्याचा अनुभव घ्या. अपयश आले तरी हार मानू नका. पुन्हा सुरवात करा. थांबू नका. रस्ता-मार्ग आपोआप दिसायला लागेल. होय, म्हणून  तुमच्यातला 'खरा उद्योजक व विक्रेता' जागा करण्यासाठी तुम्हाला या पुस्तकात टाटा, अंबानी, जेफ बेझॉस, मार्क झुकरबर्ग, जॅक मा, इलाॅन मस्क, स्टिव्ह जॉब्स, बिल गेट्स यासारख्या यशस्वी उद्योजकांनी अनुभवलेल्या आणि सांगितलेल्या टिप्स आपण पाहुयात.

Stop Doing Anything Now, Just Read!

सर्वात आधी लक्षात घ्या की कोणतीही गोष्ट दोन वेळा तयार होते. एकदा माणसाच्या विचारात आणि दुसऱ्यांदा अस्तित्वात. व्यवसाय सुद्धा असाच असतो. तो पहिल्यांदा विचारात तयार व्हायला हवा. त्यानंतरच तो अस्तित्वात येईल. म्हणून तुम्ही या पुस्तकात सांगितलेली एक-एक स्टेप आणि विचार अधिक बारकाईने अभ्यासावेत. थोडा वेळ थांबून त्यावर मनन-चिंतन करावे. तुम्ही आणि तुमच्या व्यवसाय वाढीसाठी यातून काही शिकासारखे आहे का, याचा विचार करावा. ज्या मुद्द्यांवर तुम्हाला जास्त काम करायचे आहे, जास्त लक्ष द्यायचे आहे तर ते महत्त्वाचे मुद्दे लिहून घ्यावेत. या मुद्द्यांतून तुम्हाला तुमचे SWOT Analysis करायचे आहे. तुमच्या धंद्याची एक ना एक गोष्ट माहीत करून घ्यायची आहे. एखाद्या गोष्टीची उणीव, कमतरता वाटल्यास किंवा गरज भासल्यास तुम्ही Google, YouTube, Mentor किंवा Books यांची मदत घेऊन शकता. धंदा, व्यवसाय, उद्योग करायचाच असेल तर पुर्ण तयारीनिशी उतरायचे आहे. 100% अपेक्षित ध्येय साध्य होणार म्हणजे होणार.

_________________________________

Best Selling Marathi eBook



पुस्तकाचे नाव - शिका विकायला कोणतीही गोष्ट!
भाषा - मराठी
एकूण पाने - 93
किंमत -Rs. 180/- Rs. 30/-
डाउनलोड करा - Click