जगातील पहिला मोबाईल फोन मोटोरोला कंपनीच्या मार्टिन कूपर ह्या व्यक्तीने १९७३ साली विकसित केला व वापरून दाखवला. १९९० साली जगभरात १.२४ कोटी मोबाईल फोन वापरकर्ते होते. २००९ सालाअखेरीस हा आकडा ४.६ अब्ज इतका आहे. सध्या विकसित देशांमधील १०० व्यक्तींपैकी ९७ तर जगातील १०० व्यक्तींपैकी ४५ व्यक्ती मोबाईल फोन (Smartphone) वापरत आहेत. म्हणून आज स्मार्टफोन म्हणजे आपल्या हातातील जादूची कांडीच होय.
मग मला बिझनेस सुरू करायचायं, पण त्यासाठी माझ्याकडे पैसेच नाहीय किंवा पैसे कमी आहे किंवा मला एखादी चांगली आयडियाच सुचत नाहीय असे जर तुम्ही वारंवार म्हणत असाल तर हे तुमचे म्हणणे थोडे आज मुर्खपणाचेच ठरेल, होय. तसेच मी नवीन आहे, मला बिझनेस बद्दल अजून जास्त काही माहीत नाही, माझ्याकडे व्यवसायाचे ज्ञान नाही किंवा कोणते एखादे स्किलपण नाही, अनुभवही नाही मग मी व्यवसाय कसा करू शकतो? आणि त्यातल्या त्यात ऑनलाईन बिझनेस तर कसाच शक्य नाही...असे तुम्हाला जर वाटत असेल तर लवकरच तुम्ही Outdated होण्याच्या मार्गावर आहेत, असे समजा.
होय मित्रांनो, अजूनही तुम्ही याच Outdated विचारांच्या समुद्रात बुडालेले असाल तर तुम्हाला वेळीच Update व्हायची गरज आहे असे समजा आणि आतापासूनच तुमच्या हातात असलेल्या स्मार्टफोनला म्हणजे तुमच्या जादूच्या कांडीला कामाला लावा. होय, हेच मला सांगायचंय या पुस्तकात! कारण सध्याचे युग इंटरनेटचे असल्याने ऑनलाइन राहण्याला कधी नव्हे ते अतिशय महत्त्व प्राप्त झाले आहे. अशा परिस्थितीत तुम्ही ऑनलाइन किंवा इंटरनेटच्या माध्यमातून व्यवसाय करणे खूप फायद्याचे ठरणार आहे आणि ती काळाची गरजही बनणार आहे. खरं तर मला खंत वाटते की,
आपल्या हातात Smartphone (Mobile) आला परंतु अजूनही पाहिजे तसा Smartness नाही आला.
होय, हे वास्तव कोणीही नाकारू शकत नाही. कारण ९९.९९% मला खात्री आहे की तुम्ही ज्या किंमतीत तुमचा मोबाईल विकत घेतला असेल निदान तेव्हढे पैसे तरी तुम्ही तुमच्या मोबाईलचा वापर करून कमवले नसेल किंवा तुम्ही तसा विचारही केला नसेल की आपण काहीतरी ऑनलाईन व्यवसाय करून ऑनलाईन पैसे कमवू शकतो. परंतु ठिक आहे, अजूनही काहीच बिघडलेले नाही आणि तसे केल्याशिवायही पर्याय नाही. कारण बिल गेट्स म्हणतात की जर तुमचा व्यवसाय ऑनलाईन नसेल तर तुम्ही मार्केट मध्ये जास्त वेळ टिकणार नाहीत. म्हणूनच जुन्या आणि पारंपरिक व्यवसायाच्या चौकटी मोडून ऑनलाइन व्यवसायाचा श्रीगणेशा करायला काहीच हरकत नाही, तेही आत्ताच.
तर Dear Smartphone Users,
या पुस्तकाचे शीर्षक '५१ ऑनलाईन बिझनेस आयडिया' तुमच्या मनाचे दार ठोठावत असेलच. तर याबद्दल सविस्तर समजून घेऊयात.
डाउनलोड करा - click here