Skip to main content

शेअर मार्केटचे नियम - भाग 1

 


शेअर मार्केट चे नियम.

1) ज्या व्यक्तीला पुस्तक वाचून किंवा व्हिडिओ पाहून स्टॉक खरेदी विक्री किंवा ॲनॅलिसिस  करता येत नसेल तर त्या व्यक्तीने शेअर मार्केट करू नये. कारण तुम्हाला जर खरेदी-विक्री जमत नसेल तर तुम्ही टेक्निकल ॲनॅलिसिस आणि फंडामेंटल ॲनॅलिसिस कितपत शिकणार आणि कसे शिकणार. आपल्या बुद्धीची क्षमता ओळखून घ्या. 

2. नवीन लोकांनी कमीत कमी 3, 4 वर्ष  ऑप्शन किंवा फ्यीचर ट्रेडिंग करू नये. 

3. कोणत्याही स्थितीमध्ये संधी शोधण्याची आणि फास्ट निर्णय घेण्याची क्षमता असणाराच व्यक्ती यशस्वी होतो.

4. जो व्यक्ती शेअर मार्केटला लकी ड्रॉ किंवा जुगार समजतो तो कधीच यशस्वी होणार नाही. शेअर मार्केट हा एक व्यवसाय आहे. जसे कोणत्याही व्यवसायाला स्टेबल व्हायला तीन ते चार वर्षे लागतात, तसेच तीन-चार वर्ष कष्ट,  प्रयत्न ठेवले तर शेअर मार्केट मध्ये प्रॉफिट चालू होतो.

5. कोणत्याही स्ट्रॅटेजी नुसार किंवा ऍडव्हायझरी वाल्या नुसार ट्रेड करायचा असेल तर पहिले 20 ट्रेडिंग दिवस पेपर ट्रेड करा. 20 पैकी कमीत कमी 17 दिवस नेट प्रॉफिट असले पाहिजे. जर नसेल तर त्या नुसार ट्रेड करू नका.

6. स्ट्रॅटेजी योग्य वाटली की सुरवातीला खूप कमी शेअर्स घेऊन सुरवात करा. पूर्ण आठवडा प्रॉफिट मध्ये असेल तर दर सोमवारी 25% शेअर्स वाढवा. 

7. परफेक्ट चान्स असेल तरच ट्रेड करा. एका दिवसात जास्तीत जास्त दोन ते तीन ट्रेड करा. ओव्हर ट्रेडिंग करू नये. 

8. टार्गेट किंवा स्टॉप लॉस हिट झाला की लगेच बाहेर पडा. स्टॉप लॉस उडाल्या नंतर एव्हरेज किंवा हेजिंग वैगरे असल्या गोष्टी करू नये. भावनिक होऊन ट्रेड करू नका. कारण ट्रेडिंग हे गणिता वरती चालते तुमच्या मनावर किंवा भावनेवर चालत नाही.

9. मागील लॉस कव्हर करण्यासाठी ट्रेड करू नका. असं केल्यावर अजून लॉस होईल. खूप कॉन्फिडन्स मध्ये किंवा खूप टेन्शनमध्ये ट्रेडिंग करू नका. याच्यामुळे चुकीच्या ठिकाणी ट्रेड पडतो आणि लॉस होतो.

10. शेअर मार्केट ट्रेडिंग फुल टाइम करू नका. कितीही प्रॉफिट मिळू द्या फुल टाइम अजिबात करू नका. जगा मधील कोणताच यशस्वी ट्रेडर किंवा इन्वेस्टर फुल टाईम शेअर मार्केट करत नाही, त्यांचे अन्य अजून काहीतरी इन्कम सोर्स असतात. उदाहरणार्थ ब्रोकिंग फर्म, ऍडव्हायझरी फर्म, कन्सल्टन्सी फर्म.

11. शॉर्ट टर्म, मिड टर्म, लॉन्ग टर्म असले काहीही नसते. ह्या सगळ्या व्याख्या आपल्या मनाची समजूत घालण्यासाठी असतात. योग्य वेळी स्टॉक खरेदी करा आणि योग्य वेळी स्टॉक विक्री करा, कोणत्याही व्याख्या लावून उगाच स्टॉक होल्ड करू नका.

12. फक्त इन्ट्राडे करणारा आणि फक्त इन्वेस्टमेंट करणारा व्यक्ती कधीच यशस्वी होत नाही. जो योग्य वेळी दोन्ही ट्रेडिंग करतो तोच व्यक्ती यशस्वी होतो.

13. सगळी अंडी एका ठिकाणी ठेऊ नये.  ह्या नियमानुसार तुमच्या कडे जितकी अमाऊंट असेल तिला दहा वेगळ्या वेगळ्या स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट करा.  

14. सलग तीन वर्षा प्रॉफिटेबल नंतर, 80-20 च्या नियमानुसार, 20% कष्ट केले की, 80% प्रॉफिट झाले पाहिजे. तरच शेअर मार्केट मध्ये पैसे मिळतील. नाहीतर 80% कष्ट करून, 20% प्रॉफिट होत असेल तर, शेअर मार्केट कडे जास्त लक्ष देऊ नका.

15. सगळे नियम पाळून आणि पूर्णपणे अभ्यास करून, दरवेळेस ट्रेड केल्यानंतर जर तुम्हाला लॉस होत असेल तर असे समजावे की शेअर मार्केट हे तुमच्यासाठी नाही. तुमच्यासाठी लकी नाहीये असे समजून सोडून द्या. नाहीतर एक दोन वर्ष थांबा आणि परत प्रयत्न करा.

आकाश सर, e4 बिझनेस गृप

______________________________

शेअर मार्केटमध्ये यशस्वी होण्यासाठी टॉप 10 मराठी-हिंदी बुक्स!

लेख वाचा - Click

_________________________________

Best Selling Marathi eBook



पुस्तकाचे नाव - शिका विकायला कोणतीही गोष्ट!
भाषा - मराठी
एकूण पाने - 93
किंमत -Rs. 180/- Rs. 30/-
डाउनलोड करा - Click