The Money Tree : (अभ्यासक्रम भाग - 1) वाचण्यासाठी खालील (Read Now) या ठिकाणी क्लिक करा.
The Money Tree : (अभ्यासक्रम भाग - 2)
मी ज्याच्या शोधात होते ते -
रॉबर्ट कियोसकी हे 'कँश फ्लो' नावाचा एक अर्थविषयक शिक्षण देणारा अभ्यासक्रम विकसित करत होते. मायकेलना ती संकल्पना प्रचंड अवडली. आम्ही दोघांनीही त्याबाबत चौकशी केली आणि आमची उत्सुकता पाहून त्यांनी आम्हाला त्याच्याच प्रायोगिक कार्यशाळेत सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं. तो शैक्षणिक खेळ असल्यामुळे मी आमच्या सोबत महाविद्यालयात जाऊ लागलेल्या आमच्या 19 वर्षाच्या कन्येलाही घेऊन गेले.
या प्रशिक्षणात 15 जण सहभागी झाले होते. आमचे 3 गट पाडण्यात आले. माईकेलच म्हणनं जगदी योग्य होत. मी ज्या प्रकारच्या प्रशिक्षणाच्या शोधात होते, ते मन सापडलं होतं. आमच्यासमोर एक 'व्यापारा' सारखा बोर्ड होता. त्याच्या मध्यभागी एक रंगीत झोकदार वेशभूषेतील मोठा उंदीर होता, बाहेरच्या बाजूचा आणि आतल्या बाजूचा असे दोन मार्गही होते. आतल्या बाजूचा मार्ग होता 'रॅट रेस' आणि बाहेरच्या बाजूच्या मार्गाला 'फास्ट ट्रॅक' असे नाव होते.
खेळणाऱ्यांनी आतल्या मार्गातून बाहेरच्या मार्गावर यायचं होतं. रॉबर्ट यांच्या म्हणण्यानुसार तो श्रीमंत लोकांचा मार्ग होता.
एकदा बोर्ड समजावून सांगितल्यानंतर रॉबर्ट 'रॅट रेस' बद्दल सांगू लागले. तुम्ही कोणत्याही सर्वसामान्य आयुष्य जगणाऱ्या, अगदी कष्टाळू माणसाचं उदाहरण घ्या. सगळ्यांचा मार्ग अगदी आखलेला असतो. बाळाचा जन्म होतो. तो काही वर्षांनी शाळेत जाऊ लागतो. पुढे माध्यमिक शिक्षण पूर्ण करून महाविद्यालयात जातो. चांगल्या गुणांनी पदवी मिळवतो. पदवी
मिळाली की त्याचे आई-वडील कृत्य-कृत्य होतात. आता सर्व काही ठरवल्याप्रमाणेे घडत जातं. तो पदवीधर मुलगा चांगल्या आणि सुरक्षित नोकरीचा शोध घ्यायला लागतो. तो सैन्यात जातो, डॉक्टर होतो किंवा वकील होतो. नोकरी मिळाली की त्याच्या हातात पैसा खेळू लागतो. त्याबरोबर बरेच क्रेडिट कार्ड ही हातीी पडतात आणि मग सुरु होतो खरेदीचा सिलसिला. जर तो अजून पर्यंत चालू झालेला नसताा तर.
खर्च करण्यासाठी हाती पैसा आल्यामुळे ही मुलं ही तरुण मुलं जिथे दिसतात तिथे जायला लागतात. अनेक जण भेटतात. मैत्री निर्माण होते. एखादी मुलगी भेटतं. प्रेम जुळते आणि लग्नही होतं. आता तर आयुष्य खूप आनंदी आणि समाधानी झालेलं असतं. दोन प्रिमिंग जीव एकत्र झालेले असतात. त्यात दोघेही नोकरी करणारे असतात. त्यामुळे भरपूर पैसा असतो. दोघांच्या पगारामुळे पैसे साठू लागतात. मग ते घर, गाडी, टीव्ही वगैरे खरेदी करण्याचं ठरवतात आणि तसं करतातही. मोठ्या सहलीला जाऊन येतात. आता त्यांना एखादं अपत्य हवं असतं. मग तेही होतं. मुलांची जबाबदारी आल्यामुळे पुन्हा आता पैशांची गरज भासू लागते.
या आनंदी आणि सुखी जोडप्याला आपलं करिअर ही तितकंच महत्वाचं वाटू लागतं. बढती मिळावी, पगार वाढवावा यासाठी ते आता दुपटीने काम करायला लागतात. त्याच वेळी दुसरं अपत्य ही जन्माला येतं. आता ते घर पुरेनासं होतं, मग मोठं घर हवं असतं.
अधिक पैसे मिळवण्यासाठी ते कामाला वाहून घेतात आणि एक उत्कृष्ट कर्मचारी बनतात. वाढत्या गरजेमुळे त्यांना अधिक पैसेही हवे असतात. मग ते अधिक चांगली नोकरी आणि बढती मिळवण्यासाठी वेगवेगळे अभ्यासक्रम करायला लागतात. त्यांचं फळही मिळतं, पगारही चांगला वाढतो.
आता उत्पन्न वाटलं की प्राप्तिकर, मिळकत कर, सामाजिक सुरक्षा कर आणि इतर करांमध्ये ही वाढ होते. त्यांना मोठा पगार मिळतो खरा, पण तो जातो कुठे ते त्यांचं त्यांनाही कळत नाही. ते क्रेडिट कार्ड वापरून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतात.
आता मुलं पाच-सात वर्षांची झालेले असतात. त्यांच्या महाविद्यालयीन शिक्षणाची काळजी त्यांना सतावू लागते. मुलांचे शिक्षण आणि आपली निवृत्ती यासाठी बचत करण्याची गरज त्यांना वाटू लागते.
सुमारे पस्तीशीचं हे दांपत्य आता 'रॅट रेस' मध्ये अडकतं. आता ते कंपनीच्या मालकासाठी, वेगवेगळे कर भरण्यासाठी, सरकारसाठी, घराचे आणि क्रेडिट कार्डचे हफ्ते फेडण्यासाठी आणि बॅंकेसाठी काम करायला लागतात.
तेही आपल्या मुलांना तोच, खूप अभ्यास करून उत्तम गुणांनी पदवी मिळवण्याचा आणि सुरक्षित नोकरी करण्याचा सल्ला देतात. ते आपल्या आयुष्यात पैशांविषयी काहीच ज्ञान मिळत नाही. आयुष्यभर फक्त कष्ट करत राहतात. त्यांची मुलंही त्याच मार्गाने जातात. यालाच 'रॅट रेस' असे म्हणतात.
पुढच्या लेखात
The Money Tree : (अभ्यासक्रम भाग - 3)
-------------------------
The Money Tree
'पैशाचं झाड' हा अभ्यासक्रम प्रत्येकाच्या आयुष्यात खूप गरजेचा आहे, पण शाळेत किंवा महाविद्यालयात तो शिकवला जात नाही! म्हणून e4 team (पोस्ट कॉर्नर +)™ या व्हॉट्सॲप ब्रॉडकास्टिंग गृपच्या माध्यमातून तुमच्यासाठी 'पैशाचं झाड' या अभ्यासक्रमात पैसा, आर्थिक साक्षरता, व्यवसाय, उद्योग, व्यवहार इ. विषयांवर लेखांची शृंखला सुरू केली आहे!
प्रत्येकाने याचे धडे गिरवायला हवेत!
तुम्ही, तुमच्या घरातील आई-वडील, भाऊ-बहिण, मुलं-मुली, मित्र, नातेवाईक सर्वांनीच हे लेख वाचावेत, त्यावर विचार, मंथन करून चर्चा करावी. तेव्हा आपण अर्थ साक्षर व्हायला लागू!
--------------------------

MRP - Rs. 299/- (Save Rs. 250)
Download Now

MRP - Rs. 199 (Save - Rs. 100)
Download Now
(पोस्ट कॉर्नर+)™ (महत्त्वाचे बोलू काही)
या व्हाॅट्सॲप ब्रॉडकास्टिंग गृपमध्ये
आपलं स्वागत आहे.
इथे तुम्हाला विविध महत्त्वपूर्ण पुस्तकांचे रिव्ह्यू दिले जातात. यामध्ये उद्योग, व्यवसाय, रोजगार, अर्थक्रांती, आयुष्य, शिक्षण, इंग्रजी, वाचण्यासाठी पुस्तके, प्रेरणादायी धडे, सक्सेस मंत्रा, यशस्वी कथा, भविष्यातील संधी, इ. अनेक महत्त्वाच्या विषयांवरील लेख आणि माहिती वाचायला मिळेल!
तसेच पार्ट टाईम फ्रिलांसिंग जॉब्स आणि व्यवसाय या संदर्भात नव-नवीन कल्पना व वर्क फ्रॉम होमच्या संधी यांची माहिती मिळेल!
JOIN NOW
Start Career In Freelacing Field
Need
Whatsapp Group Admin
Online Book Seller
Online Spoken English Teacher
Marketing Executive
E4 Team Member
Helpline
8007219237
E-mail : e4service4u@gmail.com