Skip to main content

शेवटपर्यंत थांबू नका!


या लेखाचे शीर्षक हे अशा लोकांसाठी आहे की जे नुसते स्वप्ने पाहत बसत नाहीये, नुसता विचार करत नाहीये तर त्यावर धडाडीने कृती करत आहेत. काही का होईना त्यांच्या जीवनात त्यांचे ध्येय मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. 

परंतु आज काल बरेच जण संयम ठेवायलाच तयार नाही. सर्वांना लगेच यश पाहिजे. विशेष तरुणांना लवकर यश मिळावं अशी अपेक्षा असते. अपेक्षा असायलाच पाहिजे परंतु जर तुम्हाला यश मिळालं नाही तर लगेच तुम्ही ते काम करणं बंद करून टाकता किंवा दुसरं काम करायला सुरुवात करता.

यामुळे कोणतेच काम व्यवस्थित होत नाही आणि पूर्णही होत नाही. सांगायचा मुद्दा हा आहे की आपण कुठल्यातरी एकाच कामावर लक्ष देत नाही. यामुळे आपले डिस्ट्रॅक्शन होते आणि जीवनात लवकर यश मिळत नाही. 

बघा यश तर लवकर पाहिजे. परंतु आपण ध्येय बदलल्यामुळे, काम बदलल्यामुळे अजून आपल्याला जास्त वेळ लागतो. कारण ज्यावेळेस आपण एखादं नवीन ध्येय ठरवतो, नवीन कामाला सुरुवात करतो त्यावेळी आपल्याला कोणताच अनुभव नसतो आणि ज्ञानही नसतं, मग त्यामुळे आपल्याला सुरुवातीपासून पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागते. त्या ध्येयाशी संबंधित ज्ञान मिळवावे लागते आणि धडपडही करावी लागते. त्यामुळे तेवढा जास्त वेळही लागतो. 

म्हणून सुरुवातीपासून ज्या ध्येयासाठी आपण मेहनत करतोय, कष्ट करतोय आणि थोड्याफार प्रमाणात का होईना, त्याचे नॉलेज आणि अनुभव आपल्याला आलेला आहे. तर अशा वेळेस Give Up करून चालणार नाही. 

तर आपलं ठरवलेले ध्येय मिळवण्यासाठी आपल्याकडून नेमक्‍या कोणत्या चुका होत आहेत, त्याचा अभ्यास करावा, अजून आपण नाविन्यपूर्ण पद्धतीने ते काम कसं करू याचा विचार करावा, जेणेकरून आपल्याला हळूहळू त्याचा चांगला परिणाम दिसायला लागेल.

------------------------------------
e4 service
Encourage | Educate | Empower | Employ

Work From Home Jobs
---------------------------------

(पोस्ट कॉर्नर +)

(महत्त्वाचे बोलू काही

या 20,000 + सदस्य असणाऱ्या व्हाॅट्सॲप ब्रॉड कास्टिंग गृपमध्ये आपलं स्वागत आहे. 
इथे उद्योग, व्यवसाय, अर्थक्रांती, पुस्तके, नवीन कोर्सेस, सक्सेस मंत्रा, फ्रिलांसिंग जॉब्स व वर्क फ्रॉम होमच्या संधी, इ. विषयांवरील लेख व माहिती वाचायला मिळेल!

Join | Learn | Share | Earn
------------------------------------
e4 team

(पोस्ट कॉर्नर +)™ ग्रृपला जॉईन होण्यासाठी खालील नावावर क्लिक करा

(पोस्ट कॉर्नर +)™

पोस्ट उपयोगी आणि आवडली असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा