Skip to main content

स्वप्नदोष समुपदेशन !



स्वप्नदोष म्हणजे वीर्य उत्सर्जन (nocturnal emission or involuntary ejaculation) खरं तर ही समस्या किंवा आजार नसून नैसर्गिक शारीरिक प्रक्रिया आहे. जे साधारतः किशोरवयीन मुलांमध्ये होतं. प्यूबर्टी च्या वेळी मुलांमध्ये मोठ्या प्रमाणावर हार्मोनल बदल होत असतात. त्यामुळे वीर्य उत्सर्जन होते. ही नैसर्गिक क्रिया प्रौढ अवस्थेपर्यंत चालू असते. खरतर या प्रक्रियेत शरीरातील अतिरिक्त स्पर्म (शुक्राणू) आणि सीमन (वीर्य) बाहेर पडतात. मनात कोणत्याही प्रकारची अस्वस्थता असेल किंवा कामोत्तेजक स्वप्न पाहिल्यामुळे स्वप्नदोष होतो.

हे अतिशय सामान्य आहे. शरीरातील अतिरिक्त स्पर्म सेक्स केल्याने किंवा हस्तमैथून केल्याने बाहेर पडतात. जर तुम्ही या दोघांपैकी काहीच करत नसाल तर ते स्वप्नदोषाद्वारे शरीराबाहेर पडतात.वैज्ञानिकदृष्ट्या स्वप्नदोष समस्येचे काही वाईट परिणाम होत नाहीत. काही उपाय करा ज्यामुळे स्वप्नदोषाचे प्रमाण आटोक्यात राहण्यास मदत होईल.

झोपण्याआधी गरम पाण्याने अंघोळ करा: गरम पाण्याने अंघोळ केल्याने शरीर व मनावरील थकवा दूर होऊन आराम मिळतो. तसंच झोपण्याआधी गरम पाण्याने अंघोळ केल्यास गाढ झोप लागते आणि स्वप्नदोषाचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. हे कसे होते तर तुमचे मन शांत असते. त्यामुळे ते अनेक गोष्टीचा विचार करत नाही अगदी कामभावनेचाही. त्यामुळे स्वप्न पडत नाही आणि त्याचा परिणाम म्हणजे स्वप्नदोष होत नाही. 

कामउत्तेजक काही वाचू किंवा पाहू नका: जर तुम्ही काही झोपण्याआधी भीतीदायक वाचलं किंवा पाहिलं तर तुम्हाला वाईट किंवा भीतीदायक स्वप्न पडतं. तसेच तुम्ही काही कामउत्तेजक वाचलं किंवा पाहिलं तर मेंदू त्या आठवणी होल्ड करून ठेवतो आणि परिणाम म्हणून तसंच स्वप्न पडतं. त्यामुळे स्वप्नदोष आटोक्यात आण्यासाठी रात्रीच्या वेळी काही कामउत्तेजक वाचू किंवा पाहू नका.

रात्री झोपण्यापूर्वी ग्रीन टी घ्या: झोपण्याआधी ग्रीन टी प्यायल्याने विशेषतः तुळशीयुक्त ग्रीन टी घेतल्याने मन व शरीर शांत होतं. त्यामुळे नक्कीच स्वप्नदोषा होण्याची संभावना कमी होते.

व्यायाम: व्यायामामुळे तुम्ही फक्त तंदुरुस्त राहत नाही तर शांत झोपही लागते. यामुळे स्वप्नदोषाला प्रतिबंध होतो. जर यावर तुम्हाला नैसर्गिक उपाय हवा असेल तर आयुर्वेदिक वैद्य तुम्हाला शिलाजीत, वंग भस्म, ब्राह्मरी किंवा जायफळ घेण्याचा सल्ला देतील.


(बिछान्यावर पडून कुशी बदलत राहण्यापेक्षा काही श्वसनाचे व्यायाम करावेत. यामुळे झोपेला चालना देणार्‍या हार्मोन्सचा शरीरात प्रवाह सुधारतो.योगा केल्याने ताण हलका होण्यास मदत होते हे सार्‍यांंनाच ठाऊक आहे. त्यामुळे शरीरातील तसेच मानसिक ताणतणाव कमी झाल्यास झोप येणे सुकर होते. त्यामुळे झोपण्यापूर्वी काही हलकी योगासनं करा. यासोबतच श्वसनावर नियंत्रण मिळवल्यानेदेखील झोप येण्यास मदत होते. यामुळे शरीरात कार्बनडायऑक्साईड साचून राहतो आणि ताण हलका होण्यास मदत होते.

पडल्या-पडल्या झोपण्यासाठी हा श्वसनाचा व्यायाम स्टेप बाय स्टेप अशाप्रकारे करा

Step 1:
उजव्या कुशीवर झोपा.

Step 2:
डोळे बंद करून दीर्घ श्वास घ्या.

Step 3:
शक्य तितका वेळ श्वास रोखून ठेवा. सुरवातीच्या काळात श्वास काही सेंकंदच रोखणे शक्य होईल. हळूहळू तुम्ही 10-15 सेकंद श्वास रोखणे शक्य होईल.

Step 4:
हा प्रयोग नियमित रात्री झोपण्यापूर्वी 5-6 वेळेस करा. हळूहळू तुमच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यास मदत होईल.
 
काही  होमिओपॅथी औषधे स्वप्नदोष या समस्येचे मूळ कारण शोधून योग्य उपचार व्हायला मदत मिळते.

संध्या होमिओपथी क्लिनिक.
डॉ.सचिन मोरे
M.D होम.
9527390227/9607524787.
drmoresachin@gmail.com.
Canada Corner, Nasik.
होमिओपॅथी एक परीपूर्ण व सर्वांगीण उपचार...।
------------------------------------
e4 service
Encourage | Educate | Empower | Employ

Work From Home Jobs
---------------------------------

(पोस्ट कॉर्नर +)

(महत्त्वाचे बोलू काही

या 20,000 + सदस्य असणाऱ्या व्हाॅट्सॲप ब्रॉड कास्टिंग गृपमध्ये आपलं स्वागत आहे. 
इथे उद्योग, व्यवसाय, अर्थक्रांती, पुस्तके, नवीन कोर्सेस, सक्सेस मंत्रा, फ्रिलांसिंग जॉब्स व वर्क फ्रॉम होमच्या संधी, इ. विषयांवरील लेख व माहिती वाचायला मिळेल!

Join | Learn | Share | Earn
------------------------------------
e4 team

(पोस्ट कॉर्नर +)™ ग्रृपला जॉईन होण्यासाठी खालील नावावर क्लिक करा

(पोस्ट कॉर्नर +)™

पोस्ट उपयोगी आणि आवडली असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा