संपूर्ण सिलिकॉन व्हॅलीचा इतिहास हा स्टार्टअपच्या कथांनी भरलेला आहे
मायक्रोसॉफ्टने पहिल्यांदा IBM ला शह दिला (खरं तर उल्लू बनवले) आणि ऑपरेटिंग सिस्टिम चे लायसन्स मिळवले.
नंतर मायक्रोसॉफ्टने अँपलचे तंत्रज्ञान चक्क चोरून GUI बेस्ड ऑपरेटिंग सिस्टिम आणली.
त्याच्या नंतर नेट्स केप नॅव्हिगेटवरनी मायक्रोसॉफ्टच्या इंटरनेट एक्सप्लोरर ला जवळ जवळ संपवले होते, पण मायक्रोसॉफ्ट ने इंटरनेट एक्सप्लोरर फुकट द्यायला सुरवात करून स्वतःची लाज राखाली (आणि नंतर कोर्टात करोडो डॉलर्सचा दंड पण भरला).
गुगलने याहू ला टक्कर देऊन सर्च एंजिन चे मार्केट अक्षरशः खाल्ले. माझ्या मते ही अत्यंत धूर्त खेळी होती. त्या वेळेस याहू ही खूप मोठी कंपनी होती. तरीही गूगलने स्वतः स्टार्टअप असून करोडो डॉलर्स चा होम पेज वरच्या जाहिराती नाकारल्या आणि सर्वात वेगवान सर्च इंजिन म्हणून नाव कमावलं.
बिल गेट्स रिटायर झाल्यावर तुलनेने सामान्य कुवतीचा स्टिव्ह बालमेर मायक्रोसॉफ्टचा CEO झाला. तेव्हा काही वर्ष मायक्रोसॉफ्टची नामुष्की झाली होती. अमाप पैसे, अमाप रेसॉर्स असून पुढं काय करायचं तेच त्यांना कळत नव्हतं. या संधीचा फायदा घेऊन अँपलनी iPhone आणि गुगलने अँड्रॉइड आणून प्रचंड यश मिळवलं.
हे सगळं होत असताना ऍमेझॉने सुरवातीपासून ईकॉमर्स मध्ये सर्वोत्तम होणे हेच लक्ष ठेऊन जवळ जवळ १५ वर्ष सर्व फायदा परत कंपनीमध्ये गुंतवून कंपनी आणि मार्केट मधला हिस्सा वाढवला आणि त्याच फळ त्यांना गेली ५ वर्ष मिळतंय.
यात अजून एक मोठी स्टार्टअप म्हणजे व्हाट्सअपची. फेसबुक मधून नोकरी नाकारलेल्या २ युवकांनी ग्राहकाची सवय आणि गरज लक्षात घेऊन तयार केलेल्या या प्रॉडक्ट ला अमाप यश मिळाले.
ही स्टार्टअपची कहाणी खालील पाच उत्तरांनी तुमच्याही व्यवसायात भरभराट आणो ही शुभेच्छा!
ग्राहकाभिमुखता
नावीन्य
संधी साधण्याची कला
मार्केटिंगची कला
लोकांना सांभाळण्याची कला
धन्यवाद ...
----------------------------------------
e4
पोस्ट कॉर्नर महत्त्वाचे बोलू काही


