वाचन म्हणजे जीवनाला उन्नत करणारी बाब असून यामुळे बुद्धीची मशागत होते. माणसाचे जीवन फुलविण्यात वाचनाचा महत्वाचा वाटा असतो. यामुळे वाचनाचा छंद जोपासून आपले जीवन समृद्ध करा. त्याचप्रमाणे जगण्याच्या परिपूर्णतेसाठी वाचन हे आवश्यक आहे. ज्ञानात वाढ करण्यासाठी वाचन हा एकमेव मार्ग आहे.
आजची लहान मुले देशाचे भवितव्य आहेत. आज जर त्यांचा वर्तमान चांगला असेल; तर देशाचे पुढील भविष्यही चांगलेच असेल. त्यासाठी लहान मुलांना चांगल्या सवयी असणे आवश्यक आहे. त्यामध्ये त्यांना वाचनाची सवयी लागणे अगत्याचे आहे.
योग्य वयात हातात पुस्तक पडले तर ती व्यक्ती हातात कधीच दगड घेत नाही. पुस्तक वाचणारा उद्योजक क्रांतिकारक होतो तर हातात दगड पडणारा उचापती समाजकंटक.
आपल्या मुलांना काय घडवायचे हा निर्णय तुम्ही आता घेतलाच पाहिजे. घर हे वाचनालय जाहले तरच आपली पुढची पिढी वाचणार आहे. आपली मुलं राजगृह बांधणारी घडावेत, राजगृहावर दगड फेकणारी नव्हेत.
प्रा. नामदेवराव जाधव, लेखक, उद्योजक
--------------------------
e4 service
Encourage | Educate | Empower | Employ
Work From Home Jobs
---------------------------------
(पोस्ट कॉर्नर +)
(महत्त्वाचे बोलू काही
या 20,000 + सदस्य असणाऱ्या व्हाॅट्सॲप ब्रॉड कास्टिंग गृपमध्ये आपलं स्वागत आहे.
इथे उद्योग, व्यवसाय, अर्थक्रांती, पुस्तके, नवीन कोर्सेस, सक्सेस मंत्रा, फ्रिलांसिंग जॉब्स व वर्क फ्रॉम होमच्या संधी, इ. विषयांवरील लेख व माहिती वाचायला मिळेल!
------------------------------------
Copyright © e4 service
