Skip to main content

जेष्ट उद्योगपती रतन टाटा यांचे सुंदर विचार!


जीवनात तसेच करिअरमध्ये केवळ शैक्षणिक किंवा करिअर विषयक ध्येय उराशी बाळगू नका. सारे जीवन सुंदर, समतोल व्यतीत करण्याच्या दृष्टीने आपले लक्ष्य व ध्येय निश्चित करा. 

म्हणजेच तुमचे आरोग्य, नाते संबंध, मानसिक स्वास्थ्य सारे-सारे उत्तम राहील अशा दृष्टीने जीवनाची बांधणी करा. तसेच बनण्याचा प्रयत्न करा. तरच आयुष्याला खरा अर्थ आहे असे मी म्हणेन.

ज्या दिवशी तुम्हाला प्रमोशन मिळणार आहे, त्याच दिवशी तुमचा घटस्फोट झाला तर काय उपयोग ...

तुम्ही अलिशान मोटारचे ड्रायव्हिंग करीत असतांना तुमची पाठ दुखत असेल तर ड्रायव्हिंगची काय मजा येणार ...

तुम्ही शॉपिंग करायला मॉलमध्ये गेला असतांना जर मनात खूप तणाव असेल तर त्याचा तुम्हाला काहीच आनंद उपभोगता येणार नाही.

आयुष्य फार गंभीरतेने खरेच घेऊ नका. जीवन हे गंभीरपणे जगण्यासाठी मुळी नाहीच. मुळातच आपण या भूतलावर कायम राहण्यासाठी आलेलो नाही. येथे तुमचे अस्तित्व काही काळासाठीच आहे, याचे सतत भान ठेवा.

मोबाईल फोनमधील प्रीपेड कार्डसारखीच आपली व्हॅलिडीटी येथे टेंपररी आहे. आपण जर खरेच नशीबवान असलो तर अजून आपण पन्नास वर्षे जगू आणि खरे बघायला गेले तर पन्नास वर्षे म्हणजे अवघे २५०० रविवार!

खरेच आपण इतके काम करण्याची मुळात गरज आहे का हा प्रश्न मनाला सतत विचारा. महाविद्यालयामध्ये शिकत असाल तर कधीकधी क्लासला आरामात दांडी मारा. काही पेपरमध्ये मार्क कमी पडले तरी हरकत नाही.

एखाद्या रोबोप्रमाणे यंत्रवत काम करु नका. आयुष्य सहजतेने जगा, आनंदाने जगा, त्याची मजा लुटा. आपल्या आजूबाजूच्या लोकांना, कुटुंबियांनाही आनंद द्या . 

ज्येष्ठ उद्योगपती, रतन टाटा
------------------------------------
e4 service
Encourage | Educate | Empower | Employ

Work From Home Jobs

---------------------------------

(पोस्ट कॉर्नर +)

(महत्त्वाचे बोलू काही

या 20,000 + सदस्य असणाऱ्या व्हाॅट्सॲप ब्रॉड कास्टिंग गृपमध्ये आपलं स्वागत आहे. 
इथे उद्योग, व्यवसाय, अर्थक्रांती, पुस्तके, नवीन कोर्सेस, सक्सेस मंत्रा, फ्रिलांसिंग जॉब्स व वर्क फ्रॉम होमच्या संधी, इ. विषयांवरील लेख व माहिती वाचायला मिळेल!

Join | Learn | Share | Earn
------------------------------------
e4 team

(पोस्ट कॉर्नर +)™ ग्रृपला जॉईन होण्यासाठी खालील नावावर क्लिक करा

(पोस्ट कॉर्नर +)™

पोस्ट उपयोगी आणि आवडली असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा