Skip to main content

तुम्ही बुद्धीमान आहात का? - तपासून घ्या!


खरंतर बुद्धिमान लोक .. सहसा समोरच्याला स्वतःबद्दल जाणून देत नाहीत.. तरीही खालील काही लक्षणे जाणून घेऊया.. यावरून आपण स्वतःच मुल्यांकन ही करू शकतो. खालील पैकी जास्तीत जास्त लक्षणे जर तुमच्यात असतील तर, तुम्हीही बुद्धिमान आहेत, असे म्हणायला काही हरकत नाही.




1) समोरच्याशी बोलत असताना ते नजरेला नजर भिडवून बोलतात.. त्याला समोरच्या च्या डोक्यात काय चालू आहे हे वाचायचे असते..


2) ते एक चांगले श्रोता असतात..


3) कमी बोलणे, बोलताना आधी विचार करतात, जास्त बडबड करणे त्यांना आवडत नाही..


४) त्यांना वाचनाची आवड असते..


५) त्यांच्याविरुद्ध असणाऱ्या लोकांशी सुद्धा वाद घालण्यात त्यांना रस नसते..


६) त्यांना नेहमी खूप सारे प्रश्न पडत असतात व त्यांची उत्तरे मिळवण्यासाठी नेहमी प्रयत्न करतात…


७) त्यांचे मोजकेच मित्र-मैत्रीण असतात..


८) मी खूप हुशार आहे हे जगासमोर सिद्ध करत बसत नाही…


९) मूर्ख माणसाशी भांडत असताना ते नेहमी त्या मूर्ख माणसाला तू बरोबर आणि मी चुकीचा हे बोलून ते भांडण थांबवतात..


१०) आयुष्याचा जोडीदार निवडताना ते खूप विचार करतात आणि सहज कोणालाही ते स्वतःच्या आयुष्यात येऊन देत नाही…


११) आयुष्यात जोखीम घेण्यास त्यांना आवडते…


१२) त्यांच्या चेहर्‍यावर नेहमी शांतता असते, ते हसमुख स्वभावाचे असतात..


१३) शक्यतो! भांडण न करता प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात..


१४) आपल्या जोडीदाराला सगळी गुपिते सांगत नाहीत.. (कामाची गोष्ट तेवढेच सांगतात)


१५) त्यांना एकटे वेळ घालवायला जास्त आवडते..


१६) त्यांना पण बुद्धिमान लोकांसोबतच वेळ घालवायला आवडतो..आपल्या लोकांना पुढे जाण्यास पाठिंबा देतात..


१७) सहसा कोणावर विश्वास ठेवत नाहीत व विश्वासू माणसांना नेहमी जपण्याचा प्रयत्न करतात..


१८) रागात शक्यतो निर्णय घेत नाहीत. लोकांच्या मताशी त्यांना देणेघेणे नसते 'ऐकावे जनाचे करावे मनाचे'..


१९) त्यांच्यासाठी टाईम महत्त्वाचा असतो..


२०) कितीही संकटे आली तरी प्रयत्न करणे सोडून देत नाही, नवीन मार्ग शोधायला लागतात..



----------------------------------------------

(पोस्ट कॉर्नर +)

(महत्त्वाचे बोलू काही)

या 20,000+ सदस्य असणाऱ्या व्हाॅट्सॲप ब्रॉड कास्टिंग गृपमध्ये आपलं स्वागत आहे. 
इथे उद्योग, व्यवसाय, अर्थक्रांती, पुस्तके, नवीन कोर्सेस, सक्सेस मंत्रा, फ्रिलांसिंग जॉब्स व वर्क फ्रॉम होमच्या संधी इ. विषयांवरील लेख व माहिती वाचायला मिळते!
e4 service
E-mail : e4service4u@gmail.com
8007219237

Start Your Freelancing Career With 
e4 Team
----------------------------------------------------
Copyright © e4 service