Skip to main content

तुमची मनाची व्याख्या काय आहे?


मन ही अशी गोष्ट आहे जी दिसत नाही पण असते. आजपर्यंत कोणीही मनाचं नेमकं ठिकाण कोठे आहे हे शोधू शकले नाही. विज्ञानाने कितीही प्रगती केली तरी मनाच्या शेवटपर्यंत विज्ञान जाऊ शकत नाही. कारण मन हे अथांग विचारांचा सागर आहे. मन हे इतकं शक्तिशाली आहे की मृत्यूनंतर शरीरांचा क्रमही मनचं ठरवते. मनाबद्दल कितीही बोललं तरी कमीच…

कधी कधी विचार करताना मनात दोन आवाज येतात म्हणून आपल्याला वाटते की आपल्याला दोन मनं आहेत. चेतन मन आणि अवचेतन मन पण वास्तविक मन हे एकच असते. या मनाच्या सात पायऱ्या असतात. जगातील ९९% लोक मनाच्या पहिल्या पायरीवर असतात तर फक्त १% लोकांनी इतर पायऱ्या पार केलेल्या असतात.

१) चेतन मन - सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मनाची अखंड बडबड चालू असते. ही बडबड मनाच्या या पायरीवर होत असते.

२) अवचेतन मन - वर्तमान काळात मनात केलेले विचार तो क्षण संपल्यावर मनाच्या या टप्प्यात साठून राहतात. जसे एखाद्या व्यक्तीशी झालेला वाद मिटला तरी त्याच्याबद्दल वाटणारा राग किंवा तिरस्कार.

३) अचेतन मन - एखाद्या व्यक्तीने आपल्याबरोबर केलेल्या चांगल्या-वाईट गोष्टींचा आपण सतत विचार करतो त्यावेळी हे मन ते विचार द्वेष किंवा प्रेम या भावनेत परावर्तीत करते.

४) भव्य चेतन मन - मनाच्या या टप्प्यात सगळी चेतना ही प्रेममयी असते. जन्मानंतर प्रत्येक मनुष्य मनाच्या याच टप्प्यावर असतो. या मनात निर्णय घेण्याची क्षमता नसते. समोर आलेल्या सर्व गोष्टी हे मन स्वीकार करते. हे मन निरागस असते त्यामुळे द्वेष, राग, अहंकार या भावनांना इथे स्थान नसते. लहान मुलांना सोन्याच्या ताटात जेवायला दिले किंवा साध्या ताटात दिले तरी त्यांना त्याचा आनंद किंवा दुःख नसते. यानंतर परिस्थितीनुसार मुलांमध्ये इतर भावनांचा उगम होतो.

५) सामूहिक चेतन मन - मनुष्याच्या पूर्वजन्मीचे चांगल्या वाईट कर्माचे फळ या मनात अंकित केलेले असते. हे मन सतगुरूंच्या दिव्य उपस्थितीतच जागृत होते. यानंतर मनातील पूर्वजन्मीचे वाईट संस्कार कमी होऊन मन शुद्ध व्हायला सुरुवात होते.

६) स्वाभाविक मन - या मनाला अध्यात्मिक भाषेत 'हृदय' म्हणतात. परमेश्वर प्रत्येकाच्या याच 'हृदयात' असतो. सतगुरू या हृदयातील भक्ती जागृत करतात. खऱ्या भक्तीची सुरुवात इथूनच होते.

७) परम मन - या मनाला 'आत्मा' म्हणतात.मनाच्या या अवस्थेत आपण शरीर आणि मन नाही तर शुद्ध आत्मा आहोत याची अनुभुती येते यालाच आत्मसाक्षात्कार म्हणतात. या मनापर्यंत पोहचणे हेच आपल्या जीवनाचे ध्येय आहे.

--------------------------

e4 service
Encourage | Educate | Empower | Employ

Work From Home Jobs
---------------------------------

(पोस्ट कॉर्नर +)

(महत्त्वाचे बोलू काही

या 20,000 + सदस्य असणाऱ्या व्हाॅट्सॲप ब्रॉड कास्टिंग गृपमध्ये आपलं स्वागत आहे. 
इथे उद्योग, व्यवसाय, अर्थक्रांती, पुस्तके, नवीन कोर्सेस, सक्सेस मंत्रा, फ्रिलांसिंग जॉब्स व वर्क फ्रॉम होमच्या संधी, इ. विषयांवरील लेख व माहिती वाचायला मिळेल!
------------------------------------
Copyright © e4 service