बघा मित्रांनो, आज तुम्हालाही माहीत आहे की सर्व काही बदलत चाललेले आहे. कोरोना आणि लॉकडाऊन मुळे अनेक व्यवसाय बंद पडले आहेत, अनेकांचे जॉब सुद्धा गेलेले आहे. फक्त एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगेल की, महाराष्ट्रात फक्त शिक्षण क्षेत्रातील जे कोचींग क्लासेस आणि प्रायव्हेट स्कूल्स आहेत तर या क्षेत्रातील जवळजवळ चार लाख लोक आज बेरोजगार झालेले आहेत. या क्षेत्रावर त्यांची कुटुंबे सर्वस्वीपणे त्यांच्यावर अवलंबून होते. त्यामुळे या क्षेत्राला खूप मोठा फटका बसलेला आहे आणि इतर क्षेत्रातील व्यवसायांचे आणि कामगारांचे सुद्धा असेच हाल आहेत.
मागच्या लेखात मी तुम्हाला जो रेफरल बिझनेसचा पर्याय सांगितला होता. तर खरंच अनेक जणांना याचा फायदा झाला. अनेकांनी मला काही प्रश्न सुद्धा विचारले की मी नेमकं रेफरल बिजनेस मध्ये काय करू शकतो. आता खरे सांगायचे झाले तर हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे की मी स्वतः नेमका कोणता व्यवसाय जो 'रेफरल बिझनेस' म्हणून करू शकतो. कारण प्रत्येकाची आवड, निवड, ज्ञान, कौशल्य, विषयातील किंवा क्षेत्रातील माहिती, ग्राहक व त्याची स्वत:ची ओळख आणि हा व्यवसाय करण्याची इच्छा, मेहनत करायची तयारी इत्यादी अनेक गोष्टींचा विचार करून निर्णय घ्यावा लागतो.
आता मी मात्र तुम्हाला फक्त काही सजेशन देऊ शकतो, तुम्हाला जर यापैकी काही सजेशन आवडले तर मला नक्की व्हाट्सअप वर मेसेज करून कळवा.
मी आज या लेखात तुम्हाला 'ऑनलाईन रेफरल बिझनेस' या व्यवसाय बद्दल अधिक माहिती देण्याचा प्रयत्न करेन. मित्रांनो, आज सर्व काही ऑनलाइन बनत चालले आहे. त्यामुळे तुम्हाला असे काही मार्ग शोधावे लागतील की ज्यामुळे तुम्ही सुद्धा ऑनलाइन काही कामे करून स्वतःचा 'ऑनलाईन रेफरल बिझनेस' व्यवसाय करू शकता. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमची जर टीम असेल तर खूप छान. हा व्यवसाय पूर्णतः तुमच्या स्वतःच्या ओळखीवर चालणार आहे. आणि दुसरे म्हणजे की तुम्हाला यासाठी काही स्मार्ट वर्क सुद्धा करावे लागणार आहे. फक्त जास्तीत जास्त तुमची ओळख कशी वाढेल यासाठी तुम्ही प्रयत्न करायला हवे.
१) स्वतःची ओळख वाढवा. तुमच्या ओळखीच्या लोकांसोबत बोला की आपण एकत्र येऊन काही ऑनलाईन कामे करू शकतो का.
२) तुमच्याकडे एक स्किल आहे व दुसऱ्याकडे दुसरे स्किल आहे. तर या दोघांना एकत्र आणून काही नवीन सर्विस किंवा प्रॉडक्ट आपल्याला ऑनलाईन विकता येईल का याचा विचार करा.
३) तुमच्या व्हाट्सअप आणि फेसबुकचा सोशल मीडिया मार्केटिंग साठी चांगल्यात चांगला वापर कसा करून घेता येईल याचा विचार करा.
४) जर तुम्हाला तुमच्या मित्राला किंवा एखाद्या ओळखीच्या व्यक्तीला जर तो व्यवसाय करत असेल तर त्याला तुम्ही काही मदत करू शकता का याचा विचार करा.
५) जर एखादी गोष्ट तुम्हाला शिकण्याची गरज असेल तर कुठलाही विलंब न करता लगेच शिकायला सुरू करा. शिकण्यासाठी इंटरनेट महाजाल आहेच.
६) छोटा विचार न करता आता थोडा मोठा विचार करा. जसं की मी ऑनलाइन बिजनेस च्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात किंवा राज्यात काही काम करू शकेल का.
७) युट्युब वर अनेक व्यवसायांची माहिती मिळू शकते. त्या व्यवसायाबद्दल जाणून घ्या. तुम्हाला त्यांच्यासाठी काही करता येईल का तो विचार करून मग त्यांच्याशी संपर्क करा.
८) आपण कोणालाही विचारण्यासाठी घाबरतो किंवा लाज वाटते. पण आता बिंदास विचारायला सुरुवात करा. 'आपण विचारत नाही' याच एका गोष्टींमुळे आपल्या हातून अनेक संधी गेलेल्या असतात.
९) शेवटी एकच प्रकारच्या व्यवसायाला सिलेक्ट करा. उदाहरण पहा, जसे की e4 Service संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांना 'ऑनलाइन स्पोकन इंग्लिश' शिकवते. आज असे अनेक विद्यार्थी व इतरही लोक आहेत की त्यांना इंग्रजी शिकायची आवड आहे किंवा गरज आहे. तसेच आज असे अनेक शिक्षक आहेत की त्यांना शिकवण्यासाठी विद्यार्थ्यांची गरज आहे. मग तुम्ही विचार करा की त्यांना मी विद्यार्थी देऊ शकतो का. शिक्षकांशी संपर्क साधा, त्यांना बोला, घाबरण्याचे काहीच कारण नाही, मी तुमच्यासाठी काही मदत करू इच्छितो, मला तुम्ही काही माहिती द्या, मी तुमच्यासाठी काही करू शकतो ते विचारा. त्यांच्याकडूनही तुम्हाला बरीच माहिती मिळू शकते.
१०) आज जवळ-जवळ प्रत्येक जण सोशल मीडियावर आहे. त्यामुळे तुम्हाला सोशल मीडिया मार्केटिंग यायला पाहिजे. युट्युब वर याचे अनेक व्हिडीओ तुम्हाला सापडतील. ते पाहा व शिका.
आणि शेवटी सुरुवात करा. होय, छोटीशी का होईना पण सुरुवात करा. शेवटी काय तर थेंबे थेंबे तळे साचे...
तर मित्रांनो, तुमच्याकडे काही स्किल असेल, नॉलेज असेल ज्यामुळे दुसऱ्यांचा फायदा होऊ शकतो, तर त्या साठी आम्ही तुम्हाला ऑनलाईन प्लॅटफॉर्म बनवून देऊ. तसेच तुमचे कोर्सेस बनवून त्याला सेल करण्यासाठी मदत करू. शेवटी काय तर आपली चर्चा होणं महत्त्वाची आहे. प्रत्येकात काही ना काही तरी 'Talent' लपलेलं असतंच. त्यासाठी तुम्ही e4 फॉर्मुला वापरू शकता.
e4 - Explore | Evaluate | Execute | Expand
या e4 फॉर्मुल्याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर नक्कीच मला व्हाट्सअप मेसेज करा.
धन्यवाद!
(पोस्ट कॉर्नर +)
(महत्त्वाचे बोलू काही

