फेसबुक उदयास येण्यापूर्वीचे फेसमॅश हे २००३ साली मार्क झुकरबर्ग द्वारा उघडले गेले आणि त्यांनीच त्याला विकसित केले. मार्क महाविद्यालयाच्या दुसऱ्या वर्षात शिकत होते तेव्हा त्यांनी फेसमॅश वेबसाईटसाठी सॉफ्टवेअर लिहले. हार्वर्डच्या विद्यार्थ्यांसाठी एक प्रकारचा "हॉट किंवा नॉट" गेम खेळण्यासाठी म्हणून वेबसाइटची स्थापना केली गेली होती. फेसमॅश वेबसाईटवर वापरकर्त्यांसाठी दोन महिला विद्यार्थिनींची तुलना करण्याची परवानगी दिली त्यांच्या आकर्षक दिसण्यावरून म्हणजेच हॉट किंवा नॉट हे त्यांनी ठरवायचे होते. वेबसाईटसाठी सॉफ्टवेअर लिहीत असताना मार्क त्यांच्या वैयक्तिक ब्लॉग वर ते काय काय करत आहेत या विषयी लिखाण करत होते. सुरुवातीला त्यांना दोन प्राण्यांच्यामधील तुलना करण्याची युक्ती सुचली होती पण नंतर बदलून त्यांनी दोन महिला विद्यार्थिनींच्या मध्ये तुलना करण्याचं ठरवलं. त्यांना वाटत नव्हतं की या त्यांच्या युक्तीला प्रचंड प्रतिसाद मिळेल. सॉफ्टवेअर लिहीत असताना त्यांनी त्यांच्या ब्लॉग मध्ये लिहिलं होत की मी थोडी नशा केली आहे.
हार्वर्ड क्रिमसनच्या म्हणण्यानुसार, फेसमॅशने नाईन हाऊसच्या ऑनलाईन फेसबुकमधून संकलित केलेले फोटो वापरले आणि वेबसाईटवर एकावेळी दोन फोटो पुढे ठेवले आणि वापरकर्त्यांना "हॉटर" व्यक्ती निवडण्यास सांगितले. ऑनलाईन पहिल्या चार तासात फेसमॅशने ४५० भेट देणारे आणि २२००० फोटो पाहणाऱ्यांना आकर्षित केले. फेसमॅश खूपच लोकप्रिय झाले पण नंतर काही दिवसातच हार्वर्ड प्रशासनाने त्यावर बंदी आणली. झुकरबर्ग यांना हद्दपारीला सामोरे जावे लागले आणि त्यांच्यावर प्रशासनाकडून सुरक्षेचा भंग, कॉपीराइटचे उल्लंघन आणि वैयक्तिक गोपनीयतेचे उल्लंघन केल्याचा आरोप लावला गेला. शेवटी, त्यांच्यावर लावलेले आरोप मागे घेण्यात आले. मार्क झुकरबर्ग यांनी आर्ट हिस्ट्रीच्या अंतिम परीक्षेपूर्वी सोशल स्टडी टूल तयार करुन सेमिस्टरच्या सुरुवातीच्या प्रकल्पात त्याचा विस्तार केला. त्यांनी वेबसाइटवर कला प्रतिमा अपलोड केल्या, त्यातील प्रत्येक फोटोला संबंधित टिप्पण्या विभागासह (Comment section) वैशिष्ट्यीकृत केले होते, त्यानंतर त्यांनी आपल्या वर्गमित्रांसह साइट शेयर केली आणि पुढे विध्यार्थी त्याच साईट द्वारे एकमेकांना नोट्स पाठवू लागले.
जगभर व्यापलेले फेसबुक आणि त्याचे मालक शून्यातून जग निर्माण करणारे मार्क झुकरबर्ग यांचा प्रवास हॉलिवूड मधील चित्रपट "द सोशल नेटवर्क" (The Social Network) यामधून उत्तमरित्या मांडला आहे. हा चित्रपट पाहून माझ्या आयुष्यात खूप बदल झाले. मार्क झुकरबर्ग माझ्यासाठी प्रेरणादायी आहेत. एक युक्ती तुम्हाला कोट्याधीश बनवू शकते. हे या चित्रपटातून शिकायला मिळाले.
फेसबुकने आपलं जाळ जगभर पसरवलं तसेच व्हाॅट्सॲप, इंस्टाग्राम यांसारखी प्रसिद्ध सोशल मीडिया ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर विकत घेतले. सॉफ्टवेअर आणि कोडींग करून, दिवस रात्र वेबसाईट वर काम करणाऱ्या मार्क झुकरबर्ग यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे जसं की व्यवसाय धोरण, नेतृत्वगुण, ध्येयवेडेपणा आणि जोखीम घेण्याचे कौशल्य.
ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर शेयर करा.
लेखक :- शुभम सुतार, कोरा वेबसाईट
_____________________________
