अत्यंत सोपे वाटणारे परंतु अत्यंत कठीण उत्तर आहे.
नीट वाचल्यास लक्षात येईलच.
आपणास होणारा आनंद हा मर्यादित स्वरूपाचा असतो.
समजा तुमचा वाढदिवस आहे तर तुम्ही मुळातच त्या दिवशी आनंदात असाल. त्यामध्ये तुम्हाला जो मुलगा किंवा मुलगी आवडते त्यांनी स्वतःहून प्रपोज केला तर तुमचा आनंद द्विगुणित होईल. त्यामध्ये संध्याकाळी त्याच दिवशी तुम्हाला हे कळले की तुम्ही एक करोड रुपयांची लॉटरी जिंकली आहे तर आधीच असलेला आनंद अजून तरी पटीने वाढेल. म्हणजेच याचा अर्थ तुमचा आधी असणारा आनंद हा मर्यादित स्वरूपाचा होता त्यामुळे त्याच्यात वृद्धी झाली.
ज्याप्रमाणे दूध हे मुळातच थोडेसे गोडसर असते परंतु त्याच्यात मी एकेक चमचा साखर वाढवत गेलो तर त्याची चव अजून आणि अजून गोड होऊन जाईल. परंतु मध घेतला व त्यामध्ये कितीही साखर टाकलेत तरी त्यामुळे मधाच्या गोड पण आत काहीही फरक पडणार नाही. त्यामुळे आपला आनंद असावा तो मधासारखा असावा.
तो कशाने मिळेल?
या जगातील प्रत्येक गोष्ट नाशिवंत आहे. पैसा करियर शरीर साथीदार मित्र-मैत्रिणी पालक ज्ञान. प्रत्येक गोष्ट नाशिवंत असल्याने कधी ना कधी तुम्हाला त्यापासून परावृत्त व्हावे लागणार. त्यामुळे त्या गोष्टी पासून तुम्हाला कितीही सुख मिळाले किंवा आनंद मिळाला तरी नंतर दुःख हे येणारच.
जेव्हा आपला जगण्यामध्ये रेफरन्स हा आजूबाजूच्या मर्त्य जगातील असतो तोपर्यंत सुख आणि दुःख हे येतच राहणार. परंतु ज्या माणसाला अनुभवाने हे कळते ही मी म्हणजे शरीर नाही, मन नाही, बुद्धी ही नाही. त्यावेळेला या तिन्ही स्तरावरील येणाऱ्या गोष्टी होत जातात परंतु समाधान आणि आनंद यामध्ये कमतरता येत नाही.
उदाहरणार्थ जर का तुम्ही स्वप्न बघत असाल व स्वप्नांमध्ये तुम्हाला दहा करोड ची लोटरी लागले किंवा स्वप्नांमध्ये तुम्ही एखाद्या उंच कड्यावरून पडलात तर त्या स्वप्नात तुम्हाला त्याचा आनंद किंवा दुःख होईल. परंतु तुम्ही जागे झालात तर त्यानंतर मात्र त्याचा कोणताही ठावठिकाणा फारसा वेळ टिकणार नाही.
त्याच प्रमाणे जेव्हा माणसाला ही जाणीव होते की या जगामध्ये देखील आजूबाजूला घडणाऱ्या सर्व चांगल्या व वाईट गोष्टी या एका डायमेन्शन मध्ये घडत आहेत. त्यामुळे फारसा फरक पडत नाही.
ज्याप्रमाणे स्वप्नात उठून आपण जागे झालो तेव्हा स्वप्नामधील आपल्या दुःखाचा आपणासच हसू आले. त्याच प्रमाणे या या जागते पणीच्या सत्यातून जेव्हा आत्मसाक्षात्कार होतो त्या वेळेला येथील सुख-दुःख आजार या सर्वांवर फक्त हसू येते यापलीकडे फारसे काही वाटत नाही.
रामकृष्ण परमहंस किंवा साईबाबा आणि अनेक संतांचे आयुष्य बघितलं तर ते लक्षात येईल. त्यांना हजारो दुखणे आली. रामकृष्ण परमहंसांच्या गळ्याला भोक पडले होते कॅन्सरमुळे. प्रचंड दुखणे होते परंतु त्या माणसाने कधीही चेहऱ्यावर निराशा आणि दुःख दाखविलें आहे. कारण हे शरीर आहे आणि त्याबरोबर होणारे भूगोल हे होतच राहणार आणि मी म्हणजे या शरीरात राहणारा आत्मा या अनुभूतीच्या यांना साक्षात्कार झाला आहे ते सतत आनंदातच वावरत असतात.
(पोस्ट कॉर्नर +)
(महत्त्वाचे बोलू काही
