अगदी थोडक्यात सांगायचे झाले तर फ्रिलांसर म्हणजे असा व्यक्ती जो त्याच्या वेळेनुसार, मनानुसार, ज्ञानानुसार, कौशल्यानुसार कुठेही केव्हाही घरी बसून मोबाईलवर, लॅपटॉपवर इंटरनेटचा वापर करून तसेच काही स्मार्ट वर्क करून दुसऱ्याचे किंवा एखाद्या कंपनीचे काम करतो आणि त्यातून स्वतःचा रोजगार निर्माण करून पैसे कमावतो. त्याला कोणाचेही बंधन नसते. तो स्वतःचा मालक असतो.
प्रत्येक जण फ्रिलांसर बनू शकतो. डॉक्टर, वकील, इंजिनीयर, पोलीस, शिक्षक, कामगार, हाऊस वाइफ, तरुण युवक, सर्व विद्यार्थी म्हणजे सर्वचजण काही ना काही तरी फ्रीलान्सिंग काम करून स्वतःचा रोजगार किंवा नवीन किंवा एक्स्ट्रा इन्कम सोर्स तयार करू शकतात. याला वयाची सुद्धा मर्यादा नसते. लहान असो किंवा मोठा किंवा वृद्ध सर्वचजण आपापल्या वेळेनुसार आणि ज्ञानानुसार हे काम करू शकतात.
फ्रिलांसिंग हे एक व्यापक क्षेत्र आहे. गुणवत्ता असलेल्या फ्रिलांसर व्यक्तीला कामाची कमतरता नसते. जर तुम्हाला नोकरीमध्ये अडकण्याची इच्छा नसेल किंवा तुम्ही स्वतंत्ररित्या तुमच्या कामाने तुमची ओळख बनवू इच्छित असाल तर हे क्षेत्र तुमच्यासाठी आहे. तुमचे काम कुणा एका कंपनीसाठी नसते इथे निवडीला भरपूर पर्याय उपलब्ध असतात.
एकापेक्षा जास्त विषयांमध्ये तुम्हाला रुची असेल तर वेगवेगळ्या प्रकारची कामे तुम्हाला मिळू शकतात. कुठल्याही एका ठराविक चौकटीमध्ये न अडकता तुम्ही तुमचे मनाजोगते आणि तुम्ही ज्या ज्या विषयांत निष्णात आहात त्या प्रकारचे काम तुम्हाला मिळू शकते.
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ज्या गोष्टीचे फ्रिलांसिंग करणार असाल त्याचे संपूर्ण ज्ञान तुम्हाला आहे का याचा विचार करणे जरुरीचे असेल. इथे अर्धवट ज्ञानाचा उपयोग नाही हे लक्षात ठेवा कारण ग्राहकांचे समाधान कधीच एका गोष्टीने होत नाही त्याला विविध पर्याय हवे असतात. ग्राहकाचे संपूर्ण समाधान होईस्तोवर त्याच्याशी चर्चा करणे गरजेचे असते.
ग्राहकांच्या मनात त्यांच्या उत्पादनाविषयी किंवा संकल्पनेविषयी काही पूर्वनियोजित कल्पना असतात त्या ऐकून घेण्याची तुमची क्षमता असली पाहिजे.
जर तुम्ही फ्रिलांसिंग कामाला नुकतीच सुरुवात केली असेल तर तुम्ही आकारात असलेल्या दरात जास्त अडून बसणे हितावह नसते कारण हेच काम तुमच्यासाठी दुसरे काम घेऊन येण्याची शक्यता असते. तुमच्या निरंतर कामाने तुमची ओळख बनते. एका रात्रीत कुणी प्रसिद्ध फ्रिलांसर बनत नसतो हेही लक्षात ठेवले पाहिजे.
तुमच्या विषयानुरूप नवनवीन कल्पनांचा तुम्ही नेहमी विचार केला पाहिजे. त्यासंबंधी पुस्तके कुठे उपलब्ध आहेत का याचा शोध घेतला पाहिजे. महाजालावर असलेल्या माहितीचे पीडीएफ तुम्ही हाताशी हवेत म्हणून संग्रहित करून ठेवले पाहिजेत.
तुमच्या विषयाच्या तज्ञाकडून तुम्हाला अशी आणखी सखोल माहिती मिळू शकते जिचा तुम्ही कधी विचारही केलेला नसतो कारण अशा तज्ञ व्यक्तीकडे प्रत्यक्ष काम केल्याचा अनुभव असतो.
फ्रिलांसिंग क्षेत्र हे समुद्रासारखे विशाल आहे. यात वेब विकास, संहिता लेखन, पटकथा लेखन, छायाचित्रण, जाहिरात लेखन, संगणक बनवून देणे, कॉम्प्युटर डिझायनिंग, मार्केटिंग, व्हीडिओ जाहिराती, अनुवादक, संगीतकार, सॉफ्टवेअर निर्मिती, संकलन, सोशल मीडिया जाहिराती, टीव्ही, रेडिओ जिंगल्स, राजकीय प्रचारपत्रके, आणि यासारखे आणखी प्रचंड विषय आहेत ज्यात तुम्ही फ्रिलांसिंग करू शकता.
जर तुम्ही नवीनच असाल तर तुम्हाला कामाचे पैसे कमी मिळाले तरी चालतील पण संपर्क ठेवणे आणि ओळख वाढविणे खूप जरुरीचे असते. सुरुवातीला तुम्ही स्वतःहून सामोरे गेल्याशिवाय तुम्हाला कोणी ओळखणारे नसते. अनेक प्रसिद्ध फ्रिलांसर नाव झाल्यानंतर भरपूर अर्थार्जन करतात आणि तासांच्या हिशोबाने त्याचे दर असतात.
शेवटी इतकेच सांगेन की कामात नावीन्य शोधत कल्पकतेने विचार करत पुढे गेलात तर भविष्य तुमचेच असेल.
तुम्हाला फ्रिलांसिंग कामासाठी खूप शुभेच्छा! आणि हो, आपल्या बहीण-भावाला, मित्राला नक्कीच ही पोस्ट शेअर करा.. जेणेकरून त्यांना पण आपल्या ग्रुप मध्ये जॉईन होता येईल, नव-नवीन गोष्टी शिकायला मिळेल...
सोबतच आपल्याला कळविण्यास आनंद होतोय की आपली e4 Service ही ऑर्गनायझेशन Freelancing Field मध्येच काम करते. आमचे (पोस्ट कॉर्नर +)™ महत्त्वाचे बोलू काही या व्हाॅट्सॲप ब्रॉडकास्टिंग गृपच्या माध्यमातून आमची टीम लवकरच भविष्यात तुम्हाला त्यासंदर्भात माहिती देतील.
Bharat Patil, Founder of e4 service
(पोस्ट कॉर्नर +)
(महत्त्वाचे बोलू काही
