आपलं मन म्हणजे असंख्य कल्पनांच घर आहे. हजारो नवीन नवीन कल्पना आपल्या मनात येतात आणि जातात.
बऱ्याच वेळा आपल्या मनात विलक्षण अशा कल्पना येऊन जातात. परंतु आपण त्या अंमलात आणत नाही. मग काही वेळानंतर आपणच विसरून जातो. अशा वेळी एक चांगली संधी आपल्या हातातून निसटून जाते. त्यामुळे आपली कल्पना ही कल्पनेच्या दुनियेतच राहून जाते. काय माहिती, या कल्पनेतून एक मोठा उद्योग उभा राहिला असता. आज तुम्हाला त्या कल्पनेचा खूप फायदा झाला असता!
तर आपण ज्या काही कल्पना करतो त्यापैकी जर तुम्हाला असं वाटत असेल की अमुक-टमुक अशी गोष्ट आहे ज्यातून मी एक चांगला व्यवसाय सुरू करू शकतो. तर त्यासाठी वेळ लावू नका. तुमच्या मनात जी कन्सेप्ट किंवा कल्पना डोक्यात आली की ती लगेच एका नोटबुक मध्ये लिहून काढा.
आता यासंबंधीचे पेपर वर्क तुम्ही सुरू करायला पाहिजे. जे जे सुचेल ते ते लिहून काढावे. हळूहळू त्या लिखाणाला एका धाग्यात गुंफावे. तो व्यवसाय सुरू करण्यासाठी कोण-कोणते मार्ग असतील त्याचा शोध घ्यावा, तेही सविस्तर लिहून काढावे.
आता तो व्यवसाय सुरू करण्यासाठी किती खर्च येईल, तो कशाप्रकारे अरेंज करावा लागेल याचा अंदाज घ्यावा. मार्केटमध्ये याला कसा स्कोप असेल याचा अभ्यास करावा. लोकांशी अप्रत्यक्षरीत्या याबद्दल चर्चा करावी. मार्केटच आकलन करून तुमच्या कल्पनेला कसा प्रतिसाद मिळेल याचाही अंदाज घ्यावा.
आता सुरुवात करण्यासाठी कसे टप्पे असतील याची एक सविस्तर यादी तयार करावी. एकेक गोष्ट जशी जशी मनात येईल तसे तशी लिहून काढावी. सुरुवातीला काय करावे लागेल, कोणतं काम आधी करावे लागेल, पहिल्या आठवड्यात, पहिल्या महिन्यात कोणकोणती कामे करायची याची माहिती सविस्तर पणे लिहून काढावी.
एकदा टप्पे लिहून काढले की मग प्रत्येक टप्प्यावर काम करावे. एकावेळी एकाच टप्प्यावर लक्ष केंद्रित करावे आणि तो टप्पा पूर्ण झाला की पुढच्या टप्पा सुरु करावा.
कोणत्याही परिस्थितीत अति विचार करण्यापेक्षा छोटीशी कृती, लहानशी ॲक्शन करण्यावर जास्तीत जास्त भर द्यावा. सुरुवात करण्यावर भर द्यावा.
सुरुवातीला खूप कन्फ्युजन असतं. त्यामुळे व्यवसाय सुरू करण्यास भरपूर अडचणी येतात, पण एकदा व्यवसाय सुरू केल्यानंतर जवळ जवळ तीन महिन्यांमध्ये आपल्याला त्या व्यवसायाबद्दल भरपूर माहिती होते, आपल्या ज्या काही शंका असतील त्याही दूर होतात आणि व्यवसाय व्यवस्थित चालायला लागतो.
----------------------------------
यशस्वी उद्योजक होऊ पाहणाऱ्या प्रत्येकासाठी
पुस्तकाचे नाव - उद्योजकांसाठी शासकीय योजनांचा खजिना!
भाषा - मराठी
एकूण पाने - 68
किंमत - Rs. 260/- (Only Rs. 30/-)
डाउनलोड लिंक - 👇🏼👇🏼
----------------------------------
(e4 उद्योजक)™
(हीच वेळ आहे मराठी माणसाने जगावर राज्य करण्याची)
या 10,000 + सदस्य असणाऱ्या व्हाॅट्सॲप ब्रॉड कास्टिंग गृपमध्ये आपलं स्वागत आहे.
इथे उद्योग, व्यवसाय, अर्थक्रांती, पुस्तके, नवीन कोर्सेस, सक्सेस मंत्रा, फ्रिलांसिंग जॉब्स व वर्क फ्रॉम होमच्या संधी, इ. विषयांवरील लेख व माहिती वाचायला मिळेल!
Join | Learn | Share | Earn
------------------------------------
e4 team - Click


