Skip to main content

भीती - मनाची आणि अपयशाची!


आपण जसा विचार करतो त्याचप्रमाणे या जगात गोष्टी घडू लागल्या तर या जगाचे स्वरुप कसे असेल? याचा आपण कधी विचार केला आहे. तेव्हा जीवनात किती रोमांस शिल्लक राहील. संसारात काहीतरी मिळविण्याची उत्कंठा आणि ती गोष्ट मिळविण्यासाठी किती धडपड करावी लागणार? हे शक्य नाही किंवा असं होऊच शकत नाही. हे निसर्गाच्या विरूद्ध आहे आणि यामुळे श्रमांचे महत्त्व कमी होईल. काहीतरी मिळविण्यासाठी काहीतरी गमावण्याचे दु:ख कित्येक पटींनी मोठे आहे. मनुष्य जेव्हा क्रोध आणि अहंकार या दोन्ही गोष्टी गमावून बसतो तेव्हा तो निराश होतो. आपल्या हातून काहीतरी निसटतं, असं त्याला वाटू लागतं.

जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर पहिल्यांदा संकंटांशी मैत्री आणि भीतीला सामोरे जायला शिका. जीवनाचे एक तत्व आहे जो तुम्हाला भीती दाखवतो त्याच्यासमोर उभे राहा. गावातील घरात झाडाखाली भूत असल्याच्या गोष्टी वारंवार सांगितल्या जातात पण एखाद्याची भूताशी भेट झाली याचे पुरावे देण्यासाठी कोणीही समोर येत नाही. बुद्धिमान लोकांनी आपल्या मनातील भीती दूर करण्यासाठी नामी यु्क्ती शोधली आहे. ज्या झाडाखाली भूत आहे त्या झाडाखाली ही माणसे जाऊन उभी राहतात. त्यांना कधीही भूत-प्रेत दिसत नाही. त्यांनी आपल्या मनातील भीतीचा सामना करण्यासाठी उपाय शोधला.

अनेकजण आपल्या मनातील भीती दूर करण्यासाठी मंदिर, दर्गा किंवा बाबाला शरण जातात ही अतिशय आश्चर्याची बाब आहे. हे ‘शांति होती है घर-परिवार में, ढूंढ़ने जाते हैं हरिद्वार में’। या म्हणीसारखं आहे. संकंटेच नसतील तर पुढचा मार्ग शोधणंही अवघड होते असे अनुभवावरून सिद्ध होते. संकटे माणसाला खाली खेचतात तसेच त्याला उभंही करतात. तेव्हा कोण किती वेळा खाली पडला याला महत्त्व नसते तर तो किती वेळा संकंटातून बाहेर आला याला अधिक महत्त्व प्राप्त होते. शुलरने एक गोष्ट सांगितली आहे की, तुम्हाला जर जास्त भीती वाटत असेल तर त्यापैकी एकाच भीतीचा तुम्हाला बंदोबस्त करायचा आहे आणि ती म्हणजे अपयशाची भीती.
--------------------------

e4 service
Encourage | Educate | Empower | Employ

Work From Home Jobs
---------------------------------

(पोस्ट कॉर्नर +)

(महत्त्वाचे बोलू काही

या 20,000 + सदस्य असणाऱ्या व्हाॅट्सॲप ब्रॉड कास्टिंग गृपमध्ये आपलं स्वागत आहे. 
इथे उद्योग, व्यवसाय, अर्थक्रांती, पुस्तके, नवीन कोर्सेस, सक्सेस मंत्रा, फ्रिलांसिंग जॉब्स व वर्क फ्रॉम होमच्या संधी, इ. विषयांवरील लेख व माहिती वाचायला मिळेल!
------------------------------------
Copyright © e4 service