Skip to main content

आत्मविश्वास कसा वाढवावा..!


मित्रांनो,
या लेखात आपण कॉन्फिडन्स कसा वाढवावा हे पाहणार आहोत. मुळामध्येच कॉन्फिडन्स असणं आणि कॉन्फिडेंट दिसणं यामध्ये फरक आहे. बऱ्याच जणांना असं वाटतं की कॉन्फिडन्स दिसणं फार महत्त्वाचं असतं. चांगले कपडे घातले, सूटबूट घातला, टाय वगैरे लावला आणि चकचकीत बूट घालून प्रेझेन्टेशन दिल की आपण कॉन्फिडेंट दिसतो.

नाही, पण असं नाहीये. मला तुम्हाला त्यातलाच फरक समजावून सांगायचा आहे. कॉन्फिडन्ट असणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि कॉन्फिडन्ट असणं हे कशावर अवलंबून आहे तर तुम्हाला आत्ता तुमच्या लाईफ मध्ये काय चालू आहे त्याच्यावर मजबूत पकड असणं.

माणूस कॉन्फिडन्ट कधी असतो? जेव्हा आत्ता त्याच्या लाईफ मधलं प्लॅनिंग परफेक्ट झालेलं आहे, मी येथे बसलेलो असताना मागे काय चाललंय, सगळीकडे काय चाललंय याविषयी प्रत्येक गोष्टींविषयी ज्ञान असणे, त्याच्यावर पकड असणे आणि प्रत्येक गोष्ट सुसूत्ररीत्या केलेल्या असणे तरच माणूस कॉन्फिडन्ट असू शकतो.

तुम्हाला जर कॉन्फिडन्ट असायचं असेल, दिसायचं नाही, असायचं असेल तर तुमचं प्लॅनिंग परफेक्ट असलं पाहिजे. तुम्हाला एक्झॅक्टली माहीत असलं पाहिजे की सध्या काय चालू आहे, उद्या काय करायचं, परवा काय करायचंय. तुमचा टाईम टेबल अतिशय व्यवस्थित असला पाहिजे. तुम्हाला हे माहित असलं पाहिजे की तुमच्या आर्थिक गरजा काय आहेत, त्याचं नियोजन काय केलेलं आहे.

पैसा असणं-नसणं, वेळ असणं-नसणं याविषयी मी बोलत नाहीये. पण त्याविषयी तुम्हाला क्लॅरिटी असणं गरजेचं आहे. यामुळे तुम्हाला कॉन्फिडन्स येतो. बऱ्याचशा वेळा आपल्या खिशात पैसा नसतो पण तो 'नाहीय' हे जरी माहीत असेल ना तरीही आपल्याला कॉन्फिडन्स येतो. 

मुळात पैसा किती आहे हेही माहीत नसतं त्यामुळे ही आपला कॉन्फिडन्स जातो. तसंच वेळेच्या बाबतीत पण आहे. तुम्हाला वेळ किती आहे, तुमच्याकडे नियोजन झालं आहे का, प्रत्येक गोष्टीचं प्लॅनिंग परफेक्ट झालेलं आहे का, यावरच आपलं कॉन्फिडन्स असणं हे अवलंबून आहे.

तुम्हाला जर कॉन्फिडन्ट बसायचं असेल तर तुमचा टाईम टेबल व्यवस्थित लिहायला शिका. तुमचा दररोजचा टाईम टेबल लिहून त्यावर इम्पलेमेंटेशन करायला शिका. ॲक्शन्स लिहायला लागा. काय करायचं, कसं करायचं, कोणी करायचं याविषयी सुसूत्रता आणा आणि तुमच्या मोबाईल मध्ये किंवा जिथे कुठे तुम्ही अलार्म लावू शकता, तो लावा. 

कुठलीही गोष्ट डोक्यात ठेवायची नाही, त्याला लिहून काढा मोबाईल मध्ये किंवा अशा व्यक्तीला सांगा की जो तुम्हाला वारंवार आठवण करून देईल. हळूहळू या सर्व गोष्टी करायला लागल्यास तुमचं कॉन्फिडन्स असणं वाढायला लागेल. 
Bharat Patil
--------------------------
e4 service
Encourage | Educate | Empower | Employ

Work From Home Jobs
---------------------------------

(पोस्ट कॉर्नर +)

(महत्त्वाचे बोलू काही

या 20,000 + सदस्य असणाऱ्या व्हाॅट्सॲप ब्रॉड कास्टिंग गृपमध्ये आपलं स्वागत आहे. 
इथे उद्योग, व्यवसाय, अर्थक्रांती, पुस्तके, नवीन कोर्सेस, सक्सेस मंत्रा, फ्रिलांसिंग जॉब्स व वर्क फ्रॉम होमच्या संधी, इ. विषयांवरील लेख व माहिती वाचायला मिळेल!
------------------------------------
Copyright © e4 service