मित्रांनो आजकाल बरेच जण असे असतात की करिअर निवडताना किंवा व्यवसाय करताना त्यांच्याकडून एखादा निर्णय चुकतो त्यामुळे त्यांचे काही नुकसान होते, ते खूप डिप्रेशनमध्ये जातात, मानसिक तणावाचे बळीही बनतात.
तर असे होऊ नये म्हणून प्रत्येकाने कुठलाही निर्णय घेण्याआधी स्वतःचे स्वॉट ॲनालिसिस करायलाच हवे. याला स्वतःची मूल्यमापन चाचणी करणे असेही म्हणता येईल.
स्वतःमध्ये इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी याचा खूप फायदा होतो. आपण स्वतःचे SWOT Analysis करून आपला यश मिळवण्याचा वेग 10 पटीने वाढवू शकतो.
तर आपण सविस्तरपणे समजून घेऊयात की SWOT Analysis म्हणजे नेमकं काय!
SWOT हा शब्द चार शब्दांचा मिळून बनलेला आहे.
S - Strengths
W - Weaknesses
O - Opportunities
T - Threats
तर मित्रांनो, आपल्याला आपले स्वतःचे स्वॉट लिहून काढावे लागेल. त्यामध्ये आपण 4 कॉलम तयार करायचे आहे. त्यामध्ये प्रत्येकाची एक यादी तयार करावी.
1) Strength -
पहिल्या कॉलम मध्ये स्ट्रेंथ (Strengths) लिहा. स्ट्रेंथ म्हणजे आपल्या मजबूत बाजू. आपण एखादी गोष्ट किती चांगली करू शकतो, आपला इंटरेस्ट किंवा पॅशन काय आहे हे स्वतःला माहीत असणे किंवा आपल्याकडे असलेले नॉलेज आणि स्किल्स याला आपण आपली स्ट्रेंथ म्हणू शकतो. याव्यतिरिक्त इतर काही गोष्टी जसे की पैसा, जागा, मार्केट इ.
समजा तुम्हाला लोकांशी चांगला संवाद साधता येतो. तुम्ही त्यांना चांगल्या पद्धतीने समजावून सांगू शकता, तर हे झालं तुमचं गुड कम्युनिकेशन स्किल. तर हे तुम्हाला तुमच्या व्यवसायांमध्ये खूप कामी येईल. अशा स्ट्रेंथ लिहून काढा.
2) Weakness -
दुसऱ्या कॉलम मध्ये विकनेस (Weakness) लिहा. विकनेस म्हणजे आपल्या कमजोर बाजू. यामध्ये आपण आपल्या ज्या वाईट सवयी असेल किंवा ज्या गोष्टी माहीत नसेल त्यांची यादी बनवावी. जसे की वेळेवर न येणे, लगेच राग येणे, अनेक लोकांसमोर बोलताना न येणे, एखादं टेक्निकल नॉलेज नसणे इ. अनेक गोष्टींची यादी बनवावी. जेणेकरून आपल्याला आपल्या विकनेसेस वर काम करता येईल.
यामध्ये तुम्ही तुमच्या आईवडिलांची, बहीण-भावांची, मित्रांची, शिक्षकांची तसेच काही मार्गदर्शक व्यक्तींची तुमच्या कमजोर बाजू कोणत्या आहेत ते विचारण्यासाठी मदत घेऊ शकता. याने तुम्हाला बऱ्याच गोष्टी लक्षात येतील.
3) Opportunities -
तिसऱ्या कॉलम मध्ये अपॉर्च्युनिटींची (Opportunities) यादी बनवावी. यामध्ये आपण जे शिक्षण घेतलेलं आहे त्याचा आपल्याला जॉब मिळवण्यासाठी किंवा व्यवसाय करण्यासाठी काही फायदा होईल का ते बघणे. त्यासाठी आज काय संधी आहेत ते पाहणे. तुम्ही मिळवलेले ज्ञान किंवा आत्मसात केलेलं स्किल आज एखादी गोष्ट मिळवण्यासाठी कामी येईल का ते पाहणे. आपला अनुभव कुठे कामाला येईल का ते पाहणे.
तर अशाप्रकारे तुम्हाला करिअर निवडण्यासाठी किंवा व्यवसाय करण्यासाठी कोणकोणत्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध आहेत त्यांची एक सविस्तर यादी बनवावी.
4) Threats -
आता चौथ्या कॉलम मध्ये थ्रेट्स (Threats) लिहावेत. थ्रेट्स म्हणजे आपले ध्येय मिळवण्यासाठी किंवा ऑब्जेक्टिव साध्य करण्यासाठी येणाऱ्या मार्गांमध्ये काय अडथळे आहे, काय धोके आहे, कॉम्पिटिशन आहे का, तुम्हाला कोणत्या गोष्टी माहित नाहीत, कोणते स्किल नाही किंवा कुठले नॉलेज नाही इ. गोष्टींचा विचार करून येणाऱ्या अडचणींची यादी तयार करावी.
समजण्यासाठी खाली एक चार्ट दिलेला आहे. त्याची मदत घेऊन तुम्ही स्वतःचे SWOT Analysis करू शकता.
तर अशा प्रकारे वरील चार गोष्टींची यादी तयार करावी आणि आपल्या स्ट्रेंथ (Strengths) आणि अपॉर्च्युनिटी (Opportunities) शोधून काढाव्यात. तसेच आपले जे काही विकनेसेस (Weaknesses) आणि थ्रेट्स (Threats) आहेत. त्यावर काम करायला सुरुवात करावी. जेणेकरून त्यामध्ये सुधारणा करून आपल्याला साध्य असलेले ध्येय लवकर गाठता येईल.
e4 team
(पोस्ट कॉर्नर+)™ (महत्त्वाचे बोलू काही)
या व्हाॅट्सॲप ब्रॉडकास्टिंग गृपमध्ये
आपलं स्वागत आहे.
इथे तुम्हाला विविध महत्त्वपूर्ण पुस्तकांचे रिव्ह्यू दिले जातात. यामध्ये उद्योग, व्यवसाय, रोजगार, अर्थक्रांती, आयुष्य, शिक्षण, इंग्रजी, वाचण्यासाठी पुस्तके, प्रेरणादायी धडे, सक्सेस मंत्रा, यशस्वी कथा, भविष्यातील संधी, इ. अनेक महत्त्वाच्या विषयांवरील लेख आणि माहिती वाचायला मिळेल!
तसेच पार्ट टाईम फ्रिलांसिंग जॉब्स आणि व्यवसाय या संदर्भात नव-नवीन कल्पना व वर्क फ्रॉम होमच्या संधी यांची माहिती मिळेल!
JOIN NOW
Start Career In Freelacing Field
Need
Whatsapp Group Admin
Online Book Seller
Online Spoken English Teacher
Marketing Executive
E4 Team Member
Website & App Developer
Helpline
8007219237
E-mail : e4service4u@gmail.com