Skip to main content

डोक्यात चांगले विचार येण्यासाठी काय कराल?


विचार केला पाहिजे की विचार कसा करावा

जगविख्यात मानसशास्त्रज्ञ व लेखक जोसेफ मर्फी त्यांच्या

The Power of Subconscious Mind
Unlock Your Master Key To Success

या पुस्तकात मानवी मनाची अवचेतन शक्ती कशी काम करते याबद्दल अगदी डिटेलमध्ये व्यवस्थितरीत्या माहिती दिलेली आहे.
आपण जे काही विचार करतो तसेच आपण बनत असतो, असे लेखक आपल्याला सांगतात. आपलं आयुष्य, जीवन दुसरं काही नसून ते एक आपल्या विचारांचा एक समूह आहे.
आपल्या मनात विचार कसे येतात, आपला मेंदू नेमका विचार कसा करतो, इं माहिती या पुस्तकात मिळते.
जर का आपण आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जे काहीही मिळवायचे ठरवलं किंवा बनायचं ठरवलं तर ते आपण सबकॉन्शस माइंडला म्हणजेच आपल्या अवचेतन मनाला जागृत करून मिळवू शकतो, त्यासाठी हे पुस्तक नक्कीच मदत करेल.

आता आपण
GIGO
टेक्निक बघुयात, तर गिगो म्हणजे

Get In - Get Out
जे विचार मनात येतात तेच बाहेर व्यक्त होतात.

जर मनात निगेटिव्ह विचार आले तर आपलं निगेटिव्ह व्यक्तिमत्व बाहेर दिसत असतं
तसेच
जर मनात पॉझिटिव्ह विचार आले तर आपलं पॉझिटिव्ह व्यक्तिमत्व बाहेर दिसत असतं.

निगेटिव्ह विचार आपल्या जीवनात नैराश्य आणतात. निगेटिव्ह विचार केल्यास कोणत्याही समस्येची सोडवणूक होत नाही अजून नवीन समस्या, नवीन संकट निर्माण होत असतात.
याउलट आपल्या जीवनात कितीही नैराश्य असलं, कितीही समस्या आणि संकटं जरी असली तरी त्यामधून सावरण्यासाठी  आपण जेव्हा पॉझिटिव्ह विचार करतो तेव्हा एक आशा निर्माण होते की आपण कोणता ना कोणता तरी उपाय शोधून, मार्ग काढून या संकटांवर मात करू शकतो.
म्हणून आपण नेमके कोणते विचार करायचे, कसे विचार करायचे, काय विचार करायचे हे आपल्यालाच ठरवायचं आहे. 


म्हणून मनात जी काही निगेटिव्ह थिंकींग चालू असते ती बंद होऊन पॉझिटिव्ह विचार येण्यासाठी काय करावे?
तुम्ही काय कराल.. तुमच्या आसपासच्या किंवा जवळच्या व्यक्तींना सल्ला मागायला जाल. मात्र त्यांच्याकडून तुमचं पाहिजे तसं समाधान होणार नाही.
मग यावर तुम्हाला थोडा सर्जनशील विचार करायचा आहे की मी ज्यांच्या कडून सल्ला घेणार तो व्यक्ती किंवा ती व्यक्ती खूप यशस्वी असावी. मग अशा लोकांपर्यंत तर आपण जाऊ शकत नाही. तर त्यासाठी एकच उपाय आहे की त्यांनी लिहिलेली पुस्तकं वाचनं.


मित्रांनो आज जगात जेवढे काही सक्सेसफुल व्यक्ती आहेत त्यांनी त्यांच्या जीवनावर पुस्तके लिहून ठेवलेले आहेत. अख्खं आयुष्य त्यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलंय.
हा एक आपल्यासाठी खूप मौल्यवान असा स्रोत आहे, जो आपल्याला इंटरनेटवर अगदी सहज उपलब्ध आहे.
विचार करा की ज्या व्यक्तीने हजारो करोडो रुपये कमवून त्यांचं स्वतःचं एक साम्राज्य, स्वतःची कंपनी उभी केली. त्याने त्याचे सर्व विचार आणि अनुभव एका पुस्तकात लिहून ठेवले आहेत. आपण किती भाग्यशाली आहोत की त्या व्यक्तीने जगलेलं पन्नास-साठ वर्षाचं आयुष्य आपण एका आठवड्यात किंवा एका महिन्यात जगतो जेव्हा आपण ते पुस्तक वाचतो. मग आपल्याला किती अनुभव येईन आणि आपले विचार किती प्रगल्भ होईल याचा विचार आपण करायला हवा.

जसे विचार तशा सवयी बनतात आणि जशा सवयी तसे व्यक्तिमत्व बनत जाते आणि जीवनात जसं व्यक्तिमत्व तसं यश मिळत असते

म्हणून चांगले विचार येण्यासाठी चांगली पुस्तके वाचली पाहिजेत आणि आपल्या मनात एका दिवसामध्ये 24 तास म्हणजेच 86400 सेकंद असतात आणि एका दिवसात जवळ-जवळ 60000 पेक्षा जास्त विचार येतात. नकळतपणे आपण या विचारांकडे लक्ष न देता जसं चालू आहे तसं आयुष्य जगत असतो. या विचारांना एक दिशा मिळत नाही. 
म्हणून तुमच्या विचारांना एक चांगली दिशा देण्यासाठी चांगली पुस्तकं मदत करतात
कारण चांगल्या पुस्तकांनीच चांगले विचार घडतात आणि चांगल्या विचारांनीच चांगली माणसं. 
म्हणून तुमच्या मनात तुम्हाला कोणते विचार येऊ द्यायचे आणि कोणते नाही हे आधी ठरवावे लागते.
____________________

हा लेख लिहिण्यासाठी मला या पुस्तकाची मदत झाली


MRP - Rs. 299/- (Rs. 30/-)
Medium - Marathi
Pages - 211