Skip to main content

तुमच्यातील टॅलेंटला बाहेर काढा!



मी मुद्दामहून या लेखात टॅलेंट हा शब्द वापरला आहे. मुळातच टॅलेंट असणे म्हणजे नेमकं काय हे बऱ्याच जणांना लवकर कळत नाही. मग आपणच व्यक्तींमध्ये, मुलांमध्ये आणि मित्रांमध्ये भेद निर्माण करतो की हा हुशार आणि हा आहे. खरं तर मित्रांनो कुणी हुशार आणि ढ नसतोच. मग टॅलेंट असणे म्हणजे नेमकं काय असणे तर ते आपण सविस्तर समजून घेऊयात.

टॅलेंट म्हणजे सजग असणे!

जर आपल्याला बुद्धी आणि मन यांच्यातला फरक कळला तर लक्षात येईल की जे काही आपण शिकतो आणि ते लक्षात ठेवतो, हे बुद्धीचं काम. समजा जर मी तुम्हाला 100 इंग्रजीचे शब्द वाचून दाखवले आणि ते तुम्ही जसेच्या तसे सांगितले तर तुम्ही खूप बुद्धिमान आहात आणि त्यापैकी दहा शब्दही सांगता आले नाही तर तुम्ही थोडे बुद्धिमान आहे किंवा ढ आहे असे आपण गृहीत धरतो. परंतु आयुष्यात बुद्धीपेक्षा मन हे प्रचंड शक्तिशाली असतं. आपल्या मनाची ताकद अमर्याद आहे. आपण जे ठरवलं ते आपण पूर्ण करू शकतो मनाच्या ताकदीने. खरं टॅलेंट इथे आहे मित्रांनो की आपलं मन सजग ठेवणे. तुमच्या मनाची तयारी असणे, जिद्द असणे. त्यामुळे बुद्धीने ढ आणि हुशार कोणीही नसतं. जेेेे काय आहे ते आपल्या मनावर अवलंबून आहे. आपण किती सजग आहोत म्हणजेे सध्या प्रेझेंट मोमेंट मध्ये आपण काय करत आहोत हे आपल्याला माहित असणेे म्हणजे सजग असणे. मित्रांनो जो व्यक्ती सजग आहेे त्याला यश मिळवण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही.


जगातील सर्वात बुद्धिमान व्यक्ती स्वतः अल्बर्ट आईन्स्टाईन म्हणतात की आपली बुद्धी 1% आणि आपलं मन 99% काम करतं. समजा त्यांनी मनातच आणलं नसतं की मला शोध लावायचा आहे, वारंवार प्रयत्न करायचा आहे तर आज विज्ञान क्षेत्रात एवढे बदल झाले नसते.

म्हणून बुद्धी असून फायदा नाही तर त्यासाठी मनाची तयारी पाहिजे, तरच एखादी गोष्ट साध्य करता येते. 

मित्रांनो बऱ्याच वेळा आपणही कन्फ्युज असतो की जीवनात यशस्वी होण्यासाठी नेमकं काय करावे. करियर निवडताना आपल्याला समजतच नाही की मी कोणत्या क्षेत्रात जॉब करू शकतो किंवा व्यवसाय करू शकतो. ही समस्या दहावी आणि बारावी झाल्यानंतर किंवा ग्रॅज्युएशन झाल्यानंतरही बऱ्याच जणांना येत असते. तसेच वयाच्या तिसाव्या वर्षापर्यंत ही बरेच जण द्विधा परिस्थितीत असतात की मी काय करू आणि काय करू नये. मग अशावेळी आपण इतरांकडे सल्ला मागायला जातो. ज्यावेळी आपण आपल्या पेक्षा मोठे असणारे भाऊ-बहीण, शिक्षक किंवा इतर क्षेत्रातील लोकांकडे जातो तेव्हा ते जे काय म्हणतील त्यांच्या नुसार आपण निर्णय घेऊन आपल्या करीयरची सुरुवात करतो. 

मित्रांनो काही दिवस झाल्यानंतर आपला निर्णय तर चुकला नाही ना असं वाटायला लागतं. मग नाईलाजाने आपले दोन ते पाच वर्ष वाया गेल्यासारखे वाटतात आणि शेवटी ज्यावेळेस जॉब करायचा किंवा व्यवसाय करायचा तेव्हा मात्र जाणीव होते की आपण काहीच कामाचं शिक्षण घेतलं नाही. 



खरंतर इथं आपली चूक असते कारण आपण दुसऱ्यांच ऐकलं आणि तसं केलं. त्यामुळे दुसऱ्यांना दोष देऊन काही फायदा नाही. निर्णय तर आपणच घेतलेला असतो. चांगलं झालं की आपल्यामुळे आणि वाईट झालं की दुसऱ्यांमुळे असं नसतं. आपण ज्यावेळेस आपल्या करिअरला सुरुवात करतो त्यावेळेस आपण राईट मोमेंटला सजग राहत नाही, आपलं मन फोकस राहत नाही. म्हणून अपयश येईल यात काही शंका नाही. 

तर आपण कोणतेही क्षेत्र निवडलं तर त्यामध्ये शंभर टक्के यशस्वी होऊ शकतो जर आपलं मन सजग असेल तर. थोडक्यात सजग म्हणजे नेमकं काय तर स्वतःला दोन प्रश्न विचारायचे की माझं ध्येय काय आहे आणि ते मिळवण्यासाठी मी आता सध्या काय करतोय.

तर तुम्ही सध्या आता तुमचं ध्येय मिळवण्यासाठी काय करत आहात हे तुम्हाला जर माहित असेल तर तुमचा मार्ग योग्य रीतीने ध्येयाकडे वाटचाल करत आहे आणि जर तसे नसेल तर आत्ताच तुम्हाला सजग होण्याची गरज आहे. म्हणून वारंवार स्वतःला एकच प्रश्न विचारत रहा की -


मी सध्या काय करत आहे! अजून तुम्हाला जर रिझल्ट पाहिजे असेल तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत दर तासाला हा प्रश्न विचारा मी माझं ध्येय मिळवण्यासाठी आता सध्या काय करत आहे. एकाच महिन्यांमध्ये आपल्याला स्वतः मध्ये खूप मोठा बदल घडलेला दिसून येईल. आपण करत असलेली विनाकारणची कामे, वायफळ असलेल्या गोष्टी बोलणं, टाइमपास होणं, सतत टेन्शनमध्ये राहणं या सर्व गोष्टी बंद होतील आणि ध्येय मिळवण्यासाठी कोणती कामे आहेत तेच तुम्ही करायला लागाल आणि हळूहळू त्याचा रिझल्ट ही तुम्हाला दिसायला लागेल. 

म्हणून माझ्या मते सजग असणे हेच खरे टॅलेंट आहे.
-------------------------------------------
e4 team

8007219237
E-mail : e4service4u@gmail.com