By Chandrakant Hundekar
मित्रांनो,
दिवसभर आपण काही ना काही तरी असे अनेक कामे करत असतो. ही कामे करताना बऱ्याच वेळेस आपल्याकडून कळत-नकळत काही चुका होत असतात तर काही विनाकारणच्या गोष्टी आपल्याकडून घडत असतात. यामुळे आपल्याला पाहिजे तसे यश मिळत नाही. या विनाकारणच्या गोष्टी आपले ध्येय साध्य करण्यासाठी अडथळे आणि अडचणी आणत असतात.
म्हणून अशा गोष्टी लगेच थांबवणे आवश्यक असते. त्याला वेळ लागता कामा नये. तर आजपासून आत्तापासून खाली दिलेल्या गोष्टी सोडून द्या.
१
तुम्हाला नक्की काय हवंय, नक्की काय करायचंय
हे न ओळखता, न ठरवता फक्त समोर येईल ते काम करत राहणं.
२
महत्त्वाची कामे करण्यात विनाकारण टाळाटाळ करणे, कारणे देणे.
३
स्वतःची कामे दुसऱ्यावर ढकलण्याची सवय.
४
समस्येच्या मुळापर्यंत जाऊन त्या सोडवण्याऐवजी इतर कारणे देत बसणे.
५
आपल्या चुकांसाठी दुसऱ्याला दोष देण्याची सवय.
६
निर्णय घेण्यात खूप उशीर करणे.
७
अपयश समोर दिसताच प्रयत्न सोडून देणे.
८
सुव्यवस्थित योजना न करणे.
९
कल्पना आल्यावर त्यांना दुर्लक्षित करण्याची सवय.
१०
दृढ इच्छा न करता केवळ कल्पना करत राहणे.
११
काही होणे, काही करणे, काही कमवण्याच्या महत्त्वाकांक्षेचा अभाव.
१२
झटपट काही मिळविण्याच्या उद्देशाने चुकीच्या मार्गांचा अवलंब करणे.
१३
लोक काय विचार करतील, लोक काय म्हणतील याची भीती.
१४
दुसऱ्याला नशीबवान समजणं आणि आपल्या नशिबाला दोष देत बसणं.
या गोष्टी सोडून दिल्या तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये काही चांगले बदल घडताना दिसून येईल आणि लवकरच आपल्या जीवनातील ध्येय मिळवता येईल!
-------------------------------------
e4 team
तुमचा लेख प्रसिद्ध करण्यासाठी आमच्या एडमिनला मेसेज किंवा कॉल करा
e4 service द्वारा संचलित
(पोस्ट कॉर्नर+)™ (महत्त्वाचे बोलू काही)
या व्हाॅट्सॲप ब्रॉडकास्टिंग गृपमध्ये
आपलं स्वागत आहे.
इथे उद्योग, व्यवसाय, अर्थक्रांती, पुस्तके, नवीन कोर्सेस, सक्सेस मंत्रा, फ्रिलांसिंग जॉब्स व वर्क फ्रॉम होमच्या संधी, इ. विषयांवरील लेख व माहिती वाचायला मिळेल!
Join | Learn | Share | Earn
----------------------------------------------------------------
व्हाट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी (Join) बटणावर क्लिक करा
JOIN
Start Career In Freelacing Field
Need
Whatsapp Group Admin
Online Book Seller
Online Spoken English Teacher
Marketing Executive
E4 Team Member
Website & App Developer
Helpline
8007219237
E-mail : e4service4u@gmail.com