मित्रांनो आयुष्यामध्ये असे होत असते की एखादी गोष्ट आपल्याला करायची इच्छा तर असते पण आपल्याला वाटते की ती आपण करू शकत नाही. ही समस्या सगळ्या वयाच्या लोकांना असते.
आजकाल बरेच जण नैराश्यामध्ये राहतात या एकाच वाक्याने की
"मी करू शकत नाही"
आज या लेखात आपण 2 शक्तिशाली प्रश्न पाहणार आहोत जे तुम्हाला एक प्रकारची स्पष्टता देतील नक्की कुठे प्रॉब्लेम होतो. असे म्हणतात एकदा रोगाचे निदान झालं की उपचार करायला सोपे जाते.
म्हणजे तुम्हाला एकदा कारण कळले की कृती करायला सोपे जाते. मग तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये हव्या त्या गोष्टी करू शकतात.
मी जे दोन प्रश्न देणार आहे त्याच्या मागं अंतर्मनाच शास्त्र आहे. आता आपण एक उदाहरण पाहुयात.
राजेश नावाचा एक नोकरदार आहे. आठ वर्षे झाली राजेशची एक इच्छा आहे. त्याला स्वतःचा व्यवसाय टाकायचा आहे. पण त्याला असे वाटते की मी तो व्यवसाय सुरू करू शकत नाही. आता बघा, त्याची इच्छा तर आहे व्यवसाय करायची पण तो अंतर्मनाला सिग्नल काय पाठवतोय की मी करू शकत नाही. आणि मित्रांनो काय असते की अंतर्मनाला चांगले-वाईट कळत नाही. त्याला फक्त शब्द, चित्र आणि भावना कळत असतात. जेव्हा तो म्हणतो की मी करू शकत नाही तेव्हा त्याचे अंतर्मन त्याला सांगते की तू ते खरंच करू शकत नाही. त्याचे अंतर्मन त्याला सगळे कारणे देऊन मोकळे होते.
मित्रांनो लक्षात ठेवा तुमचे अंतर्मन एवढे शक्तिशाली आहे की त्याच्याकडे तुमच्या सगळ्या समस्यांची उत्तरे आहेत. फक्त तुम्ही त्याला योग्य प्रकारे हाताळले पाहिजे. आता तुम्ही काय करायचे, 'मी करू शकत नाही' हे म्हणायचे नाही आणि स्वतःलाच प्रश्न विचारायचा की कोणत्या गोष्टी मला थांबवत आहे. ज्या वेळेस तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारता तेव्हा तुम्हाला वेगवेगळी कारणे भेटायला सुरुवात होते.
आता राजेश जेव्हा स्वतःला हा प्रश्न विचारेल,
"मला व्यवसाय करायला कोणत्या गोष्टी थांबवतात."
मग त्याला अशी उत्तरे भेटतील की व्यवसायाबद्दल मला काहीच ज्ञान नाही, आमच्या घरात आधी कोणीच व्यवसाय केला नाही, मी जो व्यवसाय करणार त्याला मागणी किती आहे, मी व्यवसाय चालू केला आणि नुकसान झाले तर असे त्याला भरपूर कारणे भेटतील.
मग त्याला खरंच व्यवसाय करायचा असेल तर तो प्रत्येक कारणावर कृती करायला सुरुवात करेल. ज्ञान असेल तर नॉलेज घ्यायला सुरुवात करेल, नुकसानाची भीती वाटत असेल तर त्यासाठी छोट्या भांडवलातून व्यवसाय सुरु होतो का हे चेक करेल. अशाप्रकारे तो कृती करायला सुरुवात करेल आणि त्याला व्यवसाय सुरू करण्यासाठीचा रस्ता पूर्ण मोकळा होईल.
म्हणजे ज्या-ज्या गोष्टी त्याला थांबवत होत्या त्याच्यावर तो कृती करून पुढे जाईल.
मित्रांनो अशाच प्रकारे तुम्हालाही वाटत असेल की एखादी गोष्ट तुम्ही करू शकत नाही. तर स्वतःला प्रश्न विचारा की मला कोणत्या गोष्टी थांबवत आहेत आणि मग सगळी कारणे लिहून काढा. नंतर प्रत्येक कारणावर कृती करायला सुरुवात करा.
मग बघा तुम्ही तुमच्या आवडीच्या गोष्टी करून व्यवसाय सुरू कराल.
आता समजा राजेशला सर्व ज्ञान आहे, व्यवसाय करण्यासाठी भांडवल आहे, सगळं काही आहे तरीसुद्धा तो व्यवसाय करत नसेल तर स्वतःला दुसरा प्रश्न विचारला पाहिजे. जर मी हा व्यवसाय केला तर काय होऊ शकते. सगळ्यात पहिलं म्हणजे तो दहा ते सहा या वेळेत अडकून पडणार नाही. दुसरे म्हणजे स्वतःचा व्यवसाय असल्यामुळे निर्णय घ्यायचे स्वातंत्र्य असेल. कोणाच्या हाताखाली काम करणार नाही.
सुरुवातीला थोडी जास्त मेहनत घ्यावी लागेल आणि नंतर व्यवसाय सेट झाला की फॅमिली साठी जास्त वेळ देता येईल. व्यवसायात प्रगती झाली की नोकरीपेक्षा कितीतरी पटीने तो जास्त पैसे कमवू शकतो.
अशाप्रकारे ज्या वेळी त्याला भविष्यातील चित्र दिसू लागतील तेव्हा त्याला आपोआप प्रेरणा भेटेल आणि मग तो कृती करायला लागेल. त्याला कुठल्याही मोटिवेशनची गरज भासणार नाही. मित्रांनो हा प्रश्न विचारल्यामुळे राजेशला काय-काय मदत होऊ शकते याचे चित्र दिसायला लागले आणि त्या सगळ्या गोष्टी तो अनुभवू लागला.
हा प्रश्न विचारायच्या आधी त्याच्या डोळ्यासमोर काहीच ध्येय किंवा चित्र नव्हते. पण हा प्रश्न विचारल्यामुळे त्याच्या विचारांना एक प्रकारचे वळण भेटले.
त्यामुळे मित्रांनो तुम्हाला पण अशी एखादी गोष्ट करण्याची खूप इच्छा आहे पण तुम्ही कारणे देता की मी काही करू शकत नाही.
तेव्हा हे दोन प्रश्ने स्वतःला विचारा -
१) कोणत्या गोष्टी मला थांबवत आहे?
२) आणि समजा मी ही गोष्ट केली तर काय होऊ शकते?
बघा तुम्हाला लगेच क्लॅरिटी येईल.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा!
-------------------------------------------
e4 team
Join Whatsapp Group



