Skip to main content

तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही जोपर्यंत...!

तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही जोपर्यंत...!


मार्क झुकेरबर्ग याचे नाव तुम्ही ऐकले असेलच. फेसबुक कंपनीचा मालक, जगातील सर्वात तरुण असलेला सेल्फ मेड बिलेनियर व्यक्ती असे म्हणतो की तुम्हाला कोणीही दुसरे-तिसरे थांबू शकत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतःला थांबवत नाही.


तो म्हणतो की तुमची आयडिया जगासाठी खूप महत्त्वाची आहे. तुम्ही सतत ज्या काही नवीन आयडियाज मनामध्ये आणून एक्झिक्युट करण्याचा प्रयत्न करता परंतु अपयश आले की लगेच खचून जाता, निराश होता. भले तुम्हाला कोणाचीही मदत मिळत नाहीये तरी तुम्ही दुःखी होऊन थांबू नका.
मी जर माझ्या तरुण वयात तेव्हाच थांबलो असतो तर कदाचित फेसबुक जन्माला आलच नसतं.
म्हणून मी थांबलो नाही आणि इथून पुढे थांबणारही नाही.


एकदा एका कंपनी समोर एक फलक लावण्यात येतो. त्यावर लिहिलेले असते की
तुमची प्रगती रोखणाऱ्याचा काल मृत्यू झाला व व त्याचे प्रेत शव पेटीत ठेवले आहे!

तो फलक वाचून सर्व कामगार त्या शव पेटीत कोणाचे प्रेत आहे हे पाहण्यासाठी जात परंतु शव पेटीत प्रेत नसून एक आरसा बसवलेला होता. जो कोणीही वाकून बघेल त्याला स्वतःचा चेहरा दिसायचा. ते पाहून प्रत्येकाला बोध व्हायचा आणि एक गोष्ट लक्षात यायची की माझी प्रगती दुसरे-तिसरे कोणीही थांबवत नसुन तो मी आहे. नंतर त्यांचे डोळे उघडायचे. 

तर मित्रांनो या जगात आपली प्रगती रोखणारा दुसरा कोणीही नसून तो व्यक्ती आपण स्वतःच असतो.

कंटाळा आणि आळस आपल्यातच असतो. नाकर्तेपणा हा आपल्या स्वभावात असतो. कारणे सांगणे ही प्रवृत्तीही आपलीच. प्रत्येक गोष्टीतून पळवाट काढणारे आपणच असतो. 

म्हणून आपण स्वतःच कुठलाही कंटाळा न करता आपले ध्येय गाठण्यासाठी खूप मेहनत घ्यावी.
जे लोक यशस्वी असतात त्यांची संपत्ती, पैसा, यश, स्टेटस इत्यादी गोष्टी आपल्याला दिसतात. परंतु ते मिळवण्यासाठी त्यांनी जी मेहनत घेतली, कष्ट केले ते मात्र आपल्याला दिसत नाही.

विचार करा की तुम्ही त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला तर ते थांबतील का?
म्हणून आपणही का थांबावे!

No one Can Stop You Until
You Stop

आकाश पाटील
e4 team
---------------------------------