श्रीमंती मनाची
समाजात वावरतांना आपल्याला
अनेक व्यक्ती भेटतात. अनेक अनुभव येतात. आणि ह्या व्यक्ती आणि हे अनुभव आपल्याला कायम स्मरणात राहतील अश्या गोष्टी शिकवून जातात. हेच अनुभव माणसाची वैचारिक आणि सामाजिक पातळी ठरवत असतात. आज मी एका अश्या अनुभवाबद्दल सांगणार आहे जो मला स्मरणात राहिला आणि मला चिंतन करायला भाग पाडले.
मी माझ्या डिग्रीच्या वर्षाला असतांना मी आणि माझ्या घराजवळ राहणारा मित्र दोघे एका गाडी वरुन कॉलेजला जायचो. एके दिवशी घरी परत येत असतांना मी मित्राला त्याच्या घराजवळ सोडले. तेथे गप्पा मारत असतांना तेथे एक चवळीफल्ली (एक प्रकारचे फरसाण) विकणारा माणूस आला.
तेथे बाजुलाच राहणाऱ्या एक काकू चवळीफल्ली घेण्यासाठी तेथे आल्या. त्या मध्यमवर्गीय घरातल्या होत्या. त्यांना एक लहान एक - दीड वर्षाचा नातू होता. तो घराबाहेर खेळत होता.
काकू फरसाण विकत घेत असतांना तेथे एक गरीब पाच-सहा वर्षाचा मुलगा आला. तो काकुंच्या बाजूला उभा राहून काकुंकड़े मोठ्या आशेने बघत होता. काकुंने त्याच्याकडे बघितले पन फरसाण घेऊन तश्याच घरात निघुन गेल्या.
परंतु चवळीफल्ली वाल्याला त्या गरीब मुलाची दया आली. त्याने फरसाणची एक काडी काढून त्या मुलाला दिली. तो मुलगा खुप खुश झाला. नंतर तो मुलगा त्याच्या रस्त्याने जाऊ लागला. तेव्हा तो घरासमोर खेळणारा त्या काकुंचा नातू त्या गरीब मुलाच्या हातातील फरसाणच्या काडीकडे बघू लागला. त्या गरीब मुलाच्या ते लक्षात आले.
त्याने हसुन त्या बाळाला त्या फरसाणची अर्धी काडी दिली. तो लहान मुलगा पन खुप खुश झाला. नंतर हा गरीब मुलगा त्याच्या रस्त्याने निघुन गेला.

त्या गरीब मुलाच्या कृतीने मी भाराऊन गेलो. त्याच्याकड़े फरसाण घेण्यासाठी पैसे नव्हते पन इतरांना आनंद देण्यासाठी मनाची श्रीमंती नक्कीच होती. ह्या प्रसंगाचे चिंतन करतांना मला लक्षात आले की सुख समाधानासाठी पैशाची नाही तर मनाची श्रीमंती महत्वाची आहे.
लेखक
प्रशांत दिगंबर जाधव (prashantdj)
B. Pharmacy करत असून e4 टीमचे सदस्य आहेत
(पोस्ट कॉर्नर +)
(महत्त्वाचे बोलू काही
(पोस्ट कॉर्नर +)™ ग्रृपला जॉईन होण्यासाठी खालील नावावर क्लिक करा
पोस्ट उपयोगी आणि आवडली असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा
