Skip to main content

Alert Mode - विद्यार्थ्यांसाठी!


e-l-alert-mode_1591588100BnmG2C.jpeg
जे वाचाल ते एक वास्तविक कटू सत्य आहे, थोडं मनाला रुचेल आणि टोचेलही

तर बघुया या लेखात विद्यार्थ्यांनी सजग राहणे किती गरजेचे आणि महत्त्वाचे आहेत. कोरोना व्हायरसने निर्माण केलेल्या Pandemic / Lockdown परिस्थितीमुळे जगात प्रचंड वेगाने बदल घडत आहेत आणि घडणार आहे. जर ते ओळखून त्यानुसार स्वतःमध्ये काही बदल केले नाहीत तर भविष्यात एक तुमच्या नावापुढे बेरोजगारीचा शिक्का बसलाच समजा. 

e-l-alert-mode-037655600-1591588098.jpeg

आजची वास्तविक परिस्थिती जर पाहीली तर खूप विदारक आहे. हे मी नाही तर आकडेवारी सांगते आहे. मी ही आकडेवारी गुगलवर सर्च करून अंदाजे दिलीय परंतु त्यात खूप मोठा फरक ही नाहीय - आपल्या देशाची लोकसंख्या 130 कोटी, त्यात बेरोजगारांची संख्या 30 कोटींच्या वर गेलीय आणि अजून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 40 कोटी पर्यंत आलीय, त्यातील 10 कोटी 18 वर्ष वयापेक्षा जास्त असणारी आहे. दरवर्षी जास्तीत जास्त 5 ते 10 कोटींच्या आतच रोजगार मिळतात. म्हणजे आज जर विचार केला 30 अधिक 10 म्हणजे 40 कोटींपर्यंत लोक ज्यांना जॉब पाहिजे ते घरी बसून आहेत. याला अनेक कारणेही आहेत...

e-l-alert-mode-039035300-1591588098.jpeg

जसे की प्रचंड प्रमाणात वाढणारी लोकसंख्या, टेक्नॉलॉजीचा वाढता वापर, जुनाट शिक्षणपद्धती, कोरोना सारखे संकट, काही मानवनिर्मित किंवा नैसर्गिक आपत्ती, राजकारण आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या आधुनिक आणि डिजिटल युगामध्ये जॉब किंवा व्यवसाय करण्यासाठी जे नॉलेज, क्रिएटीव्हीटी आणि स्किल्स लागतात त्यांचा अभाव, इ. अशा अनेक कारणांमुळे कदाचित आपणही बेरोजगारीचे शिकार बनलो असेल किंवा भविष्यात बनू पण शकतो..


e-l-alert-mode-080097800-1591589789.jpeg

म्हणून शिकत असताना विद्यार्थ्यांनी नेहमी सजग आणि सतर्क राहावे, त्यासाठी काही अलर्ट मोड माहिती असायलाच हवे, नाही का?

ते जाणून तुम्हाला काय योग्य आणि काय अयोग्य आहे, काय करायचे, कसे करायचे, कोणते पावलं उचलायचे हे लक्षात येईल. 

Alert Mode - 1

आपण आज घेत असलेलं शिक्षण कदाचित भविष्यात काहीच कामाचे नसेल, ते ओळखा.

Alert Mode - 2

आपली सर्जनशीलता (Creativity) गायब झाली असेल तर तुमच्या डिग्रीला काहीच अर्थ नसेल.

Alert Mode - 3

आपल्या आयुष्याच्या गाडीच स्टेरींग आपल्या हातातच नसेल तर आपण कुठंही भरकटल्या शिवाय राहणार नाही.

Alert Mode - 4

आयुष्यात जे हवं ते मिळवण्यासाठी आपण दररोज 24 तासांपैकी जास्तीत जास्त वेळ देताय का, नसेल तर अपयशच येणार.

Alert Mode - 5

आज जर आपण वेळेची किंमत केली नाही तर उद्या वेळही आपली किंमत करणार नाही

Alert Mode - 6

सोशल मीडिया आणि टेक्नॉलॉजीचा वापर आपले ध्येय गाठण्यासाठी होतोय का, नसेल तर आतापासूनच सुरुवात करावी

Alert Mode - 7

15 वर्ष वयापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी मी पैसे कमवतो का, ते किती ते सध्या इतकं महत्त्वाचं नाही, ते 1 रू, 10 रू किंवा 1000 रुपये असो, फक्त आज आले का, नसेल तर आतापासूनच पैसे कमवण्याचे मार्ग शोधा.

Alert Mode - 8

आपण आज जे आहोत ते आपल्याच विचार आणि कर्मांमुळे आहोत, उद्या जे असू ते पण त्यावरच अवलंबून आहे, मग आपला निर्णय.

Alert Mode - 9

स्वतःच्या समस्या स्वतःलाच सोडवाव्या लागणार, मग दुसऱ्यांकडून अपेक्षा करणे चुकीचे, नाही का.


Alert Mode - 10

दररोज झोपण्याआधी आज मी काय मिळवलंय असा प्रश्न स्वतःलाच विचारला पाहिजे, जर उत्तर समाधानकारक असेल तर गाडी रूळावर आहे, नसेल तर .. जागे व्हा!

------------------------------------
e4 service
Encourage | Educate | Empower | Employ

Work From Home Jobs

---------------------------------

(पोस्ट कॉर्नर +)

(महत्त्वाचे बोलू काही

या 20,000 + सदस्य असणाऱ्या व्हाॅट्सॲप ब्रॉड कास्टिंग गृपमध्ये आपलं स्वागत आहे. 
इथे उद्योग, व्यवसाय, अर्थक्रांती, पुस्तके, नवीन कोर्सेस, सक्सेस मंत्रा, फ्रिलांसिंग जॉब्स व वर्क फ्रॉम होमच्या संधी, इ. विषयांवरील लेख व माहिती वाचायला मिळेल!

Join | Learn | Share | Earn
------------------------------------
e4 team

(पोस्ट कॉर्नर +)™ ग्रृपला जॉईन होण्यासाठी खालील नावावर क्लिक करा

(पोस्ट कॉर्नर +)™

पोस्ट उपयोगी आणि आवडली असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा