Skip to main content

फक्त 1 तास द्या!



मित्रांनो, 
आपण सर्वजण आमच्या प्रत्येक लेखाला चांगला प्रतिसाद देत आहात. आमचे लेख आपणास पसंत पडत आहेत. व्हाट्सॲप वर आपण मला प्रत्यक्ष आपला अभिप्राय ही सांगत आहात, त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद!

या लेखात आपण स्वतःला इम्प्रुव्ह करण्यासाठी आपण दिलेला 1 तास किती महत्त्वाचा आहे आणि या एका तासात आपण काय केले पाहिजे ते समजून घेऊ.

मित्रांनो, दररोज आपण इतके कामे करतो किंवा एखाद्या कामात इतके व्यस्त असतो की वेळ कसा गेला तेच लक्षात येत नाही. परंतु आपण दिवसभर खरंच खूप व्यस्त आहे असे नसते. 24 तासातून किमान एक तास तरी फ्री वेेळ मिळतोच मिळतो. आणि मला हेच सांगायचे आहे की हा एक तास दुसऱ्यांसाठी नाही तर स्वत:साठी द्यावा.

एक तास स्वतःला दिला तर कदाचित आपलं जीवन पुर्णपणे बदलून जाईल. या वेळेमध्ये स्व ची ओळख निर्माण होणं गरजेचं आहे. आता एक तास नेमका कोणता द्यावा हा प्रश्र्न पडतो. तर तो स्वतःवर अवलंबून आहे. माझ्यामते रात्री झोपण्याआधी एक तास वेळ दिला पाहिजे. 

समजा रात्री ९ ला आपण झोपण्यासाठी अंथरूणावर जातो तेव्हा ९ ते १० हा एक चांगला वेळ आहे. तुमचा वेळ तुम्ही तुमच्या पद्धतीने ठरवू शकता. परंतु या वेळेत आपल्याला कोणी डिस्टर्ब करणार नाही याची काळजी घ्यावी.

मित्रांनो, आयुष्य खूप सुंदर आहे. मात्र ते सर्वांना एकदाच मिळालेलं आहे.  त्यामुळे आपल्या आयुष्यात कितीही संकट, अडचणी असू द्या. त्यांना घाबरून चालणार नाही. हे आयुष्य रडत-पडत जगायचं नाहीय तर हसत-खेळत आनंदाने जगायचं आहे. 

आज जगामध्ये एकही मनुष्य प्राणी सापडणार नाही की त्याला काहीच समस्या नाहीत. तर मग आपण आपल्या नशिबाला दोष का द्यायचा आणि आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी आपलं जीवन उध्वस्त करून टाकतील इतके आपण दुर्बल आहोत काय!

तर आपल्या मनासारखं जीवन जगण्यासाठी अर्थातच सुखी समाधानी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी आपण सजग राहायला हवं. 

तर त्यासाठी आता रात्री झोपण्याआधी आपल्या मनाला एकदम शांत बसवा. ५/१० मिनिटे एकदम हळूहळू आपल्या नाकावाटे श्वास आत-बाहेर घ्या. आपलं मन म्हणजे आपलं जीवन  आहे. आता आपण कल्पना करा की मी खूप सुंदर आयुष्य जगतोय आणि माझ्या आयुष्यात खूप चांगले बदल घडत आहेत. ज्या काही समस्या आहेत. त्या मी सोडवायला सुरवात केलेली आहे.
या वेळेत आपल्या मेंदूला आपल्या समस्या सांगा. आणि त्यावर उपाय शोधायला सांगा. असं करा... हो थोडं वेगळं वाटेल पण असं कराच. 

ही कल्पना आहे परंतु आपल्या सबकॉन्शस माइंडला म्हणजेच अवचेतन मनाला जेव्हा आपण ह्या गोष्टी सांगतो तेव्हा आपला सबकॉन्शस माइंड काम करायला सुरुवात करतो. तो आपल्या समस्या सोडविण्यासाठी काही विचार निर्माण करायला लागतो. एकाच दिवसात आपल्याला बदल दिसणार नाहीत. मात्र आपण आपल्या जीवनात सकारात्मक विचार करायला लागतो. आणि ज्या काही समस्या आहेत त्यांचे निराकरण करण्यासाठी मार्ग शोधायला लागतो. 

झोपताना आपल्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य यायलाच पाहिजे. जे तुमचं ध्येय आहे त्या ठिकाणी तुम्ही स्वतःला कन्सिडर करा आणि उद्याची कामं काय-काय करावी लागेल त्यांचा विचार करा आणि कोणते काम आधी पुर्ण करायचे, ते कसे करणार यांचा विचार करत-करत झोपी जा. 

असा सकारात्मक विचार करत करत आपण झोपी गेलो तरी चालते.  हे एक तास करायला काही हरकत नाही. कारण कितीही नकारात्मक विचार केला तर आपल्या समस्या सुटणार नाहीत त्यापेक्षा त्या सोडविण्यासाठी काही सकारात्मक विचारांची मदत घ्यायला हवी.

-------------------------------------

e4 team

तुमचा लेख प्रसिद्ध करण्यासाठी आमच्या एडमिनला मेसेज किंवा कॉल करा


e4 service द्वारा संचलित

(पोस्ट कॉर्नर+)™ (महत्त्वाचे बोलू काही) 

या व्हाॅट्सॲप ब्रॉडकास्टिंग गृपमध्ये

आपलं स्वागत आहे.

इथे उद्योग, व्यवसाय, अर्थक्रांती, पुस्तके, नवीन कोर्सेस, सक्सेस मंत्रा, फ्रिलांसिंग जॉब्स व वर्क फ्रॉम होमच्या संधी, इ. विषयांवरील लेख व माहिती वाचायला मिळेल!

Join | Learn | Share | Earn
----------------------------------------------------------------

व्हाट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी (Join) बटणावर क्लिक करा

JOIN


Start Career In Freelacing Field

Need

Whatsapp Group Admin

Online Book Seller

Online Spoken English Teacher

Marketing Executive

E4 Team Member

Website & App Developer


Helpline

8007219237

E-mail : e4service4u@gmail.com